पिशोर : वासडीत गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास कन्नडकडे जाणाऱ्या भरधाव वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तिघांना उडविले. यात एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, दोघांवर घाटीत उपचार सुरू आहेत; मात्र त्यांची प्रकृती गंभीर आहे.
संदीप नंदू आव्हाड, जालिंदर पांडुरंग घुगे, पांडुरंग शामराव मुंडे (तिघे रा.वासडी) हे तिघे कन्नड येथील एका साखर कारखान्यात कामाला आहेत. आपले काम संपवून ते घरी येत असताना गावाजवळील पुलाजवळ आपली दुचाकी (एम.एच.२०बी.एच.८११३) कडेला लावून रस्त्याच्या बाजूला गप्पा मारत उभे होते. यादरम्यान रात्री ९ वाजेच्या सुमारास कन्नडकडे जाणाऱ्या जीपने (एम एच. २१ बी एच ३००९) या तिघांना जोराची धडक दिल्याने तिघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जीपचा ड्रायव्हर पसार झाला. या तिघांवर कन्नड येथील खासगी दवाखान्यात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले होते. उपचारादरम्यान संदीप नंदू आव्हाड (३१) याचा मृत्यू झाला. रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास वासडीत संदीपच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जखमी असलेल्या जालिंदर घुगे व पांडुरंग मुंडे यांचीही प्रकृती चिंताजनक आहे. पिशोर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोना संदीप कनकुटे अधिक तपास करीत आहेत.
160421\patel mubeen abdul gafoor_img-20210416-wa0036_1.jpg
मृत्यू