लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : येथील गणेश विसर्जन मिरवणुकीतील वादानंतर पोलीस प्रशासनाने गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याप्रकरणी औंढा शहर गुरूवारी आठवडी बाजार असतानाही कडकडीत बंद ठेवले. बंदला सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळाला. तर नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन दिले .औंढा नागनाथ गणेश विसर्जन मिरवणुकीत मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत उद्धट वागणूक करून रस्ता आडवणूक करून जमाव केल्या प्रकरणी पोनि. गणपत दराडे यांनी ३५ जणांवर विविध गुन्हे दाखल केले. पोलीस प्रशासनाने कुठलीही शहानिशा न करता कारवाई केल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी याचा निषेध म्हणून गुरूवारी औंढा शहर बंदचे आवाहन केले होते. शहरात एकही दुकान उघडले नव्हते. एवढेच नव्हे, तर खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनीही दवाखाने बंद ठेवले होते. तसेच व्यापाºयांनी बंदला पाठिंबा दिला. यासंदर्भात नायब तहसीलदारांना सुरजितसिंह ठाकूर, अनिल देशमुख, विष्णू जाधव, अरुण देशमुख, सचिन देव, बालाजी शेगुकर, उत्तम गोबाडे, डॉ. प्रवीण सोनी, सतीश चोंढेकर, सुमेध मुळे, जकियोद्दीन काजी, अझहर ईनामदार, शकील ईनामदार, आश्रफ पठाण, साहेबराव देशमुख, शंकर शेळके, संदीप गोबाडे, सुरेश जावळे, तुकाराम भांडे, गणेश पाटील, चंद्रकांत जोशी, आत्माराम लाड, प्रमोद देव, राहुल दंतवार, सचिन सोनटक्के, लल्ला झांजरी आदींच्या वतीने निवेदन दिले. बंदमुळे गैरसोय झाली.
औंढा येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 11:59 PM