औरंगाबाद : कोरोनाकाळात शहरात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त १८ ते २४ एप्रिलदरम्यान रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. रविवारी पहिल्याच दिवशी राजाबाजार जैन मंदिरात आयोजित शिबिरात ६१ जणांनी रक्तदान केले.
सकल जैन समाजअंतर्गत भगवान महावीर जन्मोत्सव समितीतर्फे आठवडाभर शहरातील विविध भागांत रक्तदान शिबिर घेण्याचे नियोजन समितीने केले. रविवारी सकाळी पहिल्या शिबिराला राजाबाजार जैन मंदिरात सुरुवात झाली.
या शिबिराला सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांनी ऑनलाइन शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर शिबिराचे उद्घाटन पंचायत अध्यक्ष ललित पाटणी, जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिलकुमार संचेती यांनी केले.
मास्क लावून रक्तदाते येत होते. त्यांना सॅनिटायझर लावण्यात आले. सोशल डिस्टन्सिंग ठेऊन रक्तदान करण्यात आले. राज्य सरकारने दिलेले सर्व नियम काटेकोर पाळण्यात येत होते.
लायन्स ब्लड बँक व औरंगाबाद ब्लड बँकेचे डॉ. प्रकाश पाटणी, डॉ. पाटोदी यांचे सहकार्य मिळाले. डॉ. प्रकाश झांबड, डॉ. प्रकाश पाटणी, डॉ. सन्मती ठोले हे या शिबिराचे संयोजक आहेत.
सकल जैन समाजचे कार्याध्यक्ष सुभाष झांबड, आ. अंबादास दानवे यांनी या शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
सचिव अशोक अजमेरा, उपाध्यक्ष विनोद लोहाडे, सहसचिव नरेंद्र अजमेरा, महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष नीलेश सावलकर, महासचिव राजेश मुथा, कोषाध्यक्ष नीलेश पहाडे, कार्यक्रम संयोजक राजेंद्र पगारिया, सहसचिव प्रतीक साहुजी, अनुज दगडा आदींची यावेळी उपस्थिती होती. नीलेश पहाडे यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट
आरोग्य तपासणी शिबिर
महावीर इंटरनॅशनल व भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने १८ ते २४ एप्रिलदरम्यान संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचेही उद्घाटन करण्यात आले. हे शिबिर विविध भागांत होणार आहे. समाजबांधवांनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन, आयोजकांनी केले आहे.