तहसील कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या हस्ते झाले. पं. स. कार्यालयात उपसभापती युवराज ठेंगडे यांनी, तर न. प. कार्यालयात नगराध्यक्ष ॲड. एस. एम. कमर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सत्कार करण्यात आलेल्या सैनिकांमध्ये राहुल भीमराव मगरे, दरेगाव, अरुण पंढरीनाथ नलावडे, बाजार सावंगी(माजी सैनिक), नामदेव बाबासाहेब साळुंके, रेल, नानासाहेब रामहरी सूर्यवंशी, बळेगाव (माजी सैनिक) यांचा समावेश होता. यावेळी सभापती गणेश आधाने, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, दिनेश अंभोरे, प्रभाकर शिंदे, आदी उपस्थित होते. यशोदीप विद्या मंदिर, झरी ग्रामपंचायत कार्यालय, बोडखा येथील कैलास विद्यालयातही ध्वजारोहण करण्यात आले.
फोटो कॅप्शन : खुलताबाद पंचायत समिती कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सैनिकांचा सपत्नीक सत्कार करताना पदाधिकारी, अधिकारी.
170921\1651-img-20210917-wa0041.jpg
खुलताबाद पंचायत समिती कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सैनिकांचा सपत्नीक सत्कार करतांनी पदाधिकारी, अधिकारी.