शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

वर्ग-२ जमिनींचा अडथळा अखेर दूर

By admin | Published: March 20, 2016 11:51 PM

औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) मार्गातील वर्ग-२ जमिनींचा अडथळा अखेर दूर झाला आहे.

संजय तिपाले , बीडधाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र नारायणगडावर रविवारी पार पडलेल्या नगद नारायण महाराज यांच्या द्विशताब्दीपूर्ती पुण्यतिथी सोहळा व महंत शिवाजी महाराज यांच्या अभीष्टचिंतन कार्यक्रमात राजकीय जुगलबंदीने रंगत भरली. आ. विनायक मेटे यांनी चौफेर टोलेबाजी केली, तर माजी आमदार राजेंद्र जगताप यांच्या मिश्किल टिपण्णीने हास्याचे कारंजे उसळले. अध्यात्माच्या या व्यासपीठावर संत-महंतांबरोबरच राजकीय नेत्यांची गर्दी होती. हा दुर्मिळ योग साधून नेत्यांनी संतांपुढे आपले श्रेष्ठत्व दाखवितानाच आशीर्वादाची अपेक्षा केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच माजी आ. राजेंद्र जगताप यांनी मी आमदार असताना माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना गडावर आणले होते. त्यांनी गडावरून रायगड दिसतो, असे सांगितले होते. त्यानंतर शरद पवार आले.त्यांनी मुंबई-दिल्ली दिसते, असे म्हटले होते. गडाची भक्ती करणाऱ्यांना नगद नारायण ‘नगद’ प्रसाद देतो. मेटे ताटकळले आहेत. त्यांना नक्कीच ‘आशीर्वाद’ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.खा. रजनी पाटील भाषणात म्हणाल्या, मला गडावरून दुष्काळात होरपळणारा माणूस दिसतो. आ. विनायक मेटे यांनी माजी आ. जगताप यांच्या वक्तव्याचा धागा पकडून ‘मला विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपला आशीर्वाद दिला असता तर बरे झाले असते, असे सूचक वक्तव्य केले. यावेळी हंशा पिकला. व्यासपीठावर राकाँचे केवळ जि.प. अध्यक्ष पंडित उपस्थित होते. त्याकडे लक्ष वेधत मेटे यांनी एकमेव विजयसिंह पंडित कार्यक्रमास हजर राहिल्याचा उल्लेख केला. मी व रजनी पाटील केजवरून गडावर येतो; पण गडाच्या जवळ असणारे वळून गडाला साधे पूजत नाहीत, असे सांगून त्यांनी क्षीरसागरांचा नामोल्लेख टाळत शरसंधान केले. गडावरून कोणाला मुंबई दिसते, तर कोणाला दिल्ली दिसते; पण मला समाज दिसतो, असे सूचक वक्तव्य करून मेटे यांनी नव्या राजकीय समीकरणाची गणिते मांडली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते; परंतु न्यायालयात स्थगिती मिळविण्यासाठी जिल्ह्यातील काही ओबीसी नेत्यांनी खोडा घातला, असा टोलाही त्यांनी लगावला. भगवानगड, गोपीनाथगडावर लोक स्वत:हून येतात. कुणाच्या निमंत्राची गरज पडत नाही. ही श्रद्धा आपल्यात कधी येणार? असा सवाल त्यांनी विचारला. काही तत्त्व, धोरण मी पाळले आहेत, त्यात तडजोड नाही. राजकारण गेलं चुलीत, अशा रांगड्या शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. रणजित पाटील आले ते बरे झाले. आमचे काय व्हायचे ते होईल; पण मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचे प्रमोशन होईल, अशी आशा त्यांनी बोलून दाखविली. यावेळी पाटील यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले.