औरंगाबाद : विद्यापीठात आजपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय सबज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत मुंबई उपनगरच्या श्रीनिवास परब आणि रिद्धी मसने यांनी अनुक्रमे मुले व मुलींच्या गटात सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत ८00 पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले आहेत.श्रीनिवास परबने १८ किलोपेक्षा कमी वजन गटात अव्वल स्थान पटकावले. या वजन गटात मुंबईच्या पार्थ दळवीने रौप्य व कोल्हापूरच्या इंदर कोकारे व मुंबईच्या दूर्वांग बारडकर यांनी कास्यपदक पटकावले.मुलींमध्ये १६ किलोपेक्षा कमी वजन गटात मुंबईच्या रिद्धी मसने हिने सुवर्णपदक पटकावले. मुंबईच्या संचिता घाणेकरने रौप्य व सिंधूदुर्गच्या दूर्वा सावंत व रत्नागिरीच्या स्वराली शिंदे यांनी कास्यपदकाची कमाई केली. तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, औरंगाबाद हौशी तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष के. डी. शार्दूल, राज्य स्पर्धेचे निरीक्षक परवेज खान, विजय ढाकणे, राज्य संघटनेचे नीरज बोरसे, अविनाश बारगजे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी अजित घारगे, संतोष बारगजे, संदीप येवले, जयेश वेल्हाळे, अमोल थोरात, चंद्रशेखर जेऊरकर, योगेश विश्वासराव, अंतरा हिरे, प्रवीण वाघ, आशिष बनकर उपस्थित होते. अमृत बिºहाडे यांनी सूत्रसंचालन केले. गजेंद्र गवंडर यांनी आभार मानले. औरंगाबादची राष्ट्रीय पदकविजेती स्वरूपा कोठावळे हिने सहभागी खेळाडूंना खिलाडूवृत्तीची शपथ दिली. या स्पर्धेत लता कलवार, संदीप येवले, अविनाश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली ३0 जण पंच म्हणून काम पाहत आहेत.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शरद पवार, सागर वाघ, प्रतीक जांभूळकर, प्रतीक काळे, विवेक देशपांडे, विशाल सुरडकर, विद्या कोठावळे, प्रीती खरात, राधिका शर्मा, कोमल आगलावे, प्रेम पेहरकर, प्रथमेश शिंदे, अभिषेक मोघे, प्रतीक्षा एखंडे, मोहितसिंग, समीर जोशी, आशुतोष सावजी, स्वरूपा कोठावळे, प्रथमेश शिंदे, अभिषेक मोघे, प्रतीक्षा एखंडे, सचिन मगरे, सोहम साळवे, अंजली तायडे, रोहिणी फड, हिमानी शर्मा आदी परिश्रम घेत आहेत.
राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत श्रीनिवास, रिद्धी यांना सुवर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 1:06 AM