वाळूज महानगर : तीसगाव, वाळूज महानगर बचाव व आरोग्य बचाव कृती समितीतर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारी सिडको कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी सिडको प्रशासनावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून चलेजावचा नारा दिला. मात्र, माहिती देवूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरविल्याने आंदोलकांनी प्रशासनाचा निषेध केला.
सिडकोने दोन दशकांपूर्वी निवासी क्षेत्र विकसित करण्यासाठी परिसरातील तीसगाव, वडगाव कोल्हाटी, गोलवाडी, वळदगाव, रांजणगाव, साजापूर, जोगेश्वरी, वाळूज, नायगाव आदी १८ गावांतील शेकडो एकर जमीन संपादित केली. जमिनी संपादित करताना शेतकऱ्यांना मोबदला तसेच पर्यायी जमिन देण्याचे आश्वासन दिले होते. परंतू अद्याप अनेक शेतकºयांना अद्याप जमिनीचा मोबदला व प्रत्यक्ष पर्यायी जमीन मिळालेली नाही. ज्या नागरी वसाहती विकसित केल्या तेथेही मूलभूत सुविधा देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे विविध मागण्यांसाठी कृती समितीतर्फे सोमवारी सिडको कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. तीसगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून पायी मोर्चाला सुरुवात झाली. सिडको कार्यालयासमोर मार्चा धडकताच आंदोलकांनी सिडको प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.
यावेळी कृती समितीचे अंजन साळवे, जि.प. सदस्य रमेश गायकवाड, कमलसिंग सूर्यवंशी, भागिनाथ साळे, किशोर साळवे, सुरेश फुलारे, करण साळे, नागेश कुठारे, किशोर पिसे, प्रकाश निकम, प्रविण नितनवरे, रावसाहेब धोंडरे आदींनी सिडकोच्या कारभाराविषयी प्रश्न उपस्थित केले. मोर्चात संजय जाधव, ईश्वरसिंग तरैयावाले, अस्लम शेख, कमलसिंग सूर्यवंशी, किशोर म्हस्के, सुगंध दाभाडे, राजेश कसुरे, जगदिश शेलार, अशोक त्रिभुवन, कल्पना वाघमारे, लता बन, कृष्णा साळे, हिरालाल सूर्यवंशी, विष्णू चौधरी, सिद्धार्थ साळवे, लालचंद कसुरे आदींसह शेतकरी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार लक्ष्मण उंबरे, मेजर संजय हंबीर, पोहेकाँ. वसंत शेळके आदींसह दंगल नियंत्रण पथकाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या विषयी सिडकोचे प्रशासक पंजाबराव चव्हाण यांच्याशी चर्चा केली असत्