शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
4
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
5
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
6
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
7
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
10
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
11
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
12
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
13
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
14
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
15
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
16
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
17
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
18
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
19
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
20
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान

रोहयोची कामे याच महिन्यात सुरू करा, दिरंगाई करणाऱ्यांची गय करणार नाही: संदीपान भुमरे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 11:53 AM

विभागातील सर्व जिल्ह्यांनी शासनाने रोहयोअंतर्गत कुशल व अकुशल कामांचा दिलेला निधी खर्च करून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत.

औरंगाबाद : रोजगार हमी योजनेतील मंजूर काम डिसेंबरअखेर सुरू करून विभागाने दिलेला लक्ष्य प्रत्येक जिल्ह्यांनी पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री, रोजगार हमी व फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांनी सोमवारी विभागीय आढावा बैठकीत दिले. आठही जिल्ह्यांतील रोहयोचे उपजिल्हाधिकारी; तसेच संबंधित अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला रोहयो सचिव नंदकुमार, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीणा, उपायुक्त रोहयो समीक्षा चंद्राकार यांच्यासह गटविकास अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.मातोश्री पाणंद रस्त्याची कामे पूर्ण करून ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी रस्ता द्यावा. विशेषत: अंबड व घनसावंगी (जि. जालना) या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी शेतरस्त्यासाठी वारंवार मागणी केलेली आहे. ती पूर्ण करण्यासाठी गटविकास अधिकारी, उपजिल्हाधिकारी यांनी कालबद्ध कार्यक्रम आखावा. अन्यथा डिसेंबरनंतर संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश भुमरे यांनी दिले. विभागातील सर्व जिल्ह्यांनी शासनाने रोहयोअंतर्गत कुशल व अकुशल कामांचा दिलेला निधी खर्च करून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत. सामूहिक, वैयक्तिक विहीर, शोषखड्डे, पाणंद रस्ते, वृक्षलागवड, घरकुल बांधणी या कामांची बैठकीत उजळणी करण्यात आली.

दिरंगाई करणाऱ्यांची गय करणार नाहीडिसेंबरअखेरपर्यंत रोहयोची कामे सुरू न केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा सचिव नंदकुमार यांनी दिला. रोहयोच्या कामात दिरंगाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. शेतकरी व गरीब दुर्बलांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी राज्यात रोजगार हमी योजना राबविली जात आहे. यामध्ये उपजीविकेसोबत शिक्षण, आरोग्य, राहणीमान व आर्थिक प्रगती यासाठी रोहयोची अंमलबजावणी प्रशासकीय यंत्रणेने प्रामाणिकपणे करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Sandipan Bhumreसंदीपान भुमरेAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा