शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
2
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
3
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
4
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
5
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
6
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
7
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
8
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
9
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
10
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
11
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
12
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
13
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
14
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
15
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
16
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
17
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
18
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
19
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
20
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल

गोदावरी नदीतून जलवाहतूक सुरू करणार, डिसेंबरमध्ये प्रत्यक्षात कामास होणार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2018 11:38 PM

नदीजोड प्रकल्पातून गोदावरी नदीला भरपूर पाणी राहणार आहे.

औरंगाबाद : नदीजोड प्रकल्पातून गोदावरी नदीला भरपूर पाणी राहणार आहे. नाशिक ते नांदेड आणि पुढे काकिनाडापर्यंत जलवाहतुकीचा मार्ग तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. डिसेंबरपर्यंत प्रत्यक्षात काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी असलेला नदीजोड प्रकल्प असून, याद्वारे दमनगंगेचे पाणी गोदावरीकडे वळवण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे जायकवाडी धरणात जलसाठा वाढणार आहे. रस्ते, रेल्वे आणि विमानमार्गाचा खर्च अधिक येतो, तुलनेने जलवाहतूक ही सर्वात स्वस्त व किफायतशीर असल्याचे गडकरी म्हणाले. त्यामुळे नाशिक ते नांदेड आणि पुढे काकिनाडापर्यंत जलवाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न आहे. यादृष्टीने तयारी केली जात असून, या प्रकल्पाचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. आराखडा सादर होताच डिसेंबरपर्यंत याचे प्रत्यक्षात काम सुरू करण्यात येईल, असे ते म्हणाले. राज्यात जलवाहतुकीसाठी पोर्ट उभारणी करण्यास जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आॅफ इंडिया पुढाकार घेणार असून, नांदेड येथे पोर्ट उभारले जाणार आहे. जलवाहतुकीमुळे मराठवाड्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्याचा दावाही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केला. अकोला आणि बुलडाणा या दोन्ही जिल्ह्यांनी नदीजोड प्रकल्पात उल्लेखनीय काम केले आहे. हाच कित्ता मराठवाड्यात गिरविण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. शेतकºयांनी माती दिल्यास त्यांना मोफत शेततळी बांधून दिली जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले.दहा लाख कोटींचा कामे पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्तदेशभरात गत चार वर्षांत रस्ते बांधणीवर दहा लाख कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. यात झीरो टॉलरन्स करप्शन आणि पारदर्शकता ठेवण्यात आली. रस्ते काँक्रिटीकरणावर भर असून, उत्कृष्ट दर्जाच्या कामांमुळे किमान आगामी शंभर वर्षे या रस्त्यांवर खड्डे पडणार नसल्याचे गडकरी म्हणाले...............................मनमाड-इंदूर मार्गाचे काम लवकरचमनमाड ते इंदूर रेल्वे मार्गाचे कामही आगामी तीन महिन्यांत सुरू करण्यात येणार आहे. या मार्गामुळे दिल्ली ते चेन्नई, बंगळुरू यादरम्यानचे अंतर कमी होणार असल्याचे गडकरी म्हणाले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद