वाळूज महानगर : राज्यभरातील सर्व गावातील गावठाणामधील जमिनीचे जिओग्राफीक इन्फॉरमेशन सिस्टिमवर (जीआयएस) आधारित ड्रोनद्वारे सर्वेक्षण व भूमापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पाटोदा गावातून या सर्वेक्षणाचा गुरुवारी शुभारंभ करण्यात आला.
राज्याचा ग्रामविकास विभाग, जमाबंदी आयुक्त व देहरादून येथील भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात गावठाणातील जमीन मोजण्यात येत आहे.
पाटोदा येथे गुरुवारी ड्रोनद्वारे सर्व्हेक्षणाचा शुभारंभ भूमिलेख मराठवाडा विभागाचे उपसंचालक संजय टिकले,भूमीअभिलेखचे प्राचार्य कृष्णा कणसे, जिल्हा अधीक्षक अभय जोशी, उपअधीक्षक दुष्यंत कोळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश दाभाडे, गटविकास अधिकारी एम.सी.राठोड, सरपंच भास्कर पा.पेरे, ग्रामविकास अधिकारी पी.एस.पाटील, उपसरपंच विष्णु राठोड आदींच्या उपस्थितीत करण्यात आला. या प्रसंगी गणेश मुचक, लहु मुचक, सखाराम पेरे, नंदु मातकर, मच्छिंद्र मातकर, जनार्धन मुचक, दिपाली पेरे आदींची उपस्थिती होती. यावेळी ड्रोन द्वारे गावातील गावठाण हद्दीतील मालमत्तेचे सर्व्हेक्षण करण्यात आले.