शेंद्रा : नवसाला पावणारा देव अशी ख्याती असलेल्या मांगीरबाबा यात्रेची सुरुवात मंगळवारी अभिषेकाने होत आहे. ३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर, २५ अधिकारी व १३० पोलिसांचा ताफा सुरक्षेसाठी शेंद्रा परिसरात दाखल झाला आहे. दरवर्षी चैत्राच्या कडक उन्हाळ्यात मांगीरबाबा यात्रेला महाराष्ट्र तसेच बाहेर राज्यांतील भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. यात्रेनिमित्त प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात्रा काळात जालना रोडवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. यासाठी जवळपास चार-पाच किलोमीटरपर्यंत सर्व ठिकाणचे दुभाजक बंद करण्यात आलेलेआहेत.जालना रोड ते गावात मांगीरबाबा मंदिरापर्यंत रस्त्यावरील असलेली सर्व अतिक्रमणे सोमवारी पोलिसांनी काढली आहेत. वाहनाने अथवा रेल्वेने आलेल्या भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी मंदिरापर्यंत रस्त्यावरील अतिक्रमण केल्यास पोलिसांकडून त्यावर कारवाई केली जाणार आहे. तसेच यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.आरोग्य पथक दाखलयात्रेतील भाविकांना आरोग्याची काही समस्या निर्माण झाल्यावर या ठिकाणी डॉक्टरांचे पथक सोमवारी सकाळपासून दाखल झाले आहे.तीस टँॅकरने पाणीया वर्षी विहिरींनी तळ गाठला असून, अत्यल्प पाणी असल्याने यात्रेतील भाविकांना टँकरच्या पाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायत व सामाजिक संस्था यांच्याकडून जवळपास तीस पाण्याचे टँॅकर यात्रा परिसरात पाणीपुरवठा करणार आहेत. गरज भासल्यास टँकरची संख्या वाढवण्यात येईल, असे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले आहे.२०२० पासून मांगीरबाबा यात्रेत गळ टोचणे बंद होणारऔरंगाबाद : मंगळवारपासून शेंद्रा येथे मांगीरबाबांची यात्रा सुरू होत आहे. या यात्रेत नवस पूर्ण करण्यासाठी कमरेला लोखंडी गळ टोचण्याची प्रथा आजही आहे. परंतु साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या २०२० या जन्मशताब्दी वर्षाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यानंतर मात्र ही प्रथा कायमची बंद होईल, असा विश्वास क्रांतिगुरूलहुजी साळवे विकास परिषदेचे प्रवक्ते संतोष पवार यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला. ते म्हणाले, या यात्रेत संघटनेतर्फे ५० हजार पत्रके वाटली जातील.महार हाडोळा जमिनीची विक्री करता येत नसतानाही शेंद्रा येथील गट क्र. ९७, ९९ ची विक्री कशी काय झाली, असा सवाल संतोष पवार यांनी यावेळी उपस्थित करून मांगीरबाबा देवस्थान विकास प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी केली. संस्थापक अध्यक्ष उत्तमराव कांबळे, राजू खाजेकर, आनंद चांदणे, मच्छिंद्र कांबळे, संदीप मानकर, सुवर्णा साबळे, कल्पना त्रिभुवन, कैलास पवार, कुणाल मानकर, प्रकाश शेजवळ, सुनील भारस्कर, संजय कसारे, शंभोनाथ रणक्षेत्रे व राजे त्रिभुवन आदींची यावेळी उपस्थिती होती.
मांगीरबाबा यात्रेस आजपासून प्रारंभ
By admin | Published: April 25, 2016 11:37 PM