मुजीब देवणीकर/ शेख महेमूद ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद/वाळूज महानगर : मागील अनेक महिन्यांपासून मुस्लिम बांधव चातकाप्रमाणे ज्या इज्तेमाची वाट पाहत होते त्याला शनिवारी ‘फजर’च्या नमाजनंतर दिल्ली मरकजचे प्रमुख मौलाना साद साहब आणि मौलाना युसूफ कंधलवी यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. इज्तेमाच्या पहिल्याच दिवशी लाखो साथींनी हजेरी लावली. उद्या इज्तेमाच्या दुसºया दिवशी आणखी साथी येणार आहेत.शनिवारी पहाटे ‘फजर’च्या नमाजनंतर या भव्य-दिव्य इज्तेमाला सुरुवात झाली. या राज्यस्तरीय इज्तेमासाठी देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने ‘साथी’बांधवांचे आगमन होत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, मालेगाव, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, जालना, सोलापूर, धुळे, परभणी, नांदेड, बीड, बुलडाणा, अकोला, सिंधुदुर्ग, औरंगाबाद आदी भागांतील तसेच देश-विदेशातील भाविक लाखोंच्या संख्येने इज्तेमास्थळी हजर झाले.इज्तेमाची पूर्वतयारी व ‘दावत’ देण्यासाठी देशभरातून निघालेल्या हजारो जमाअतच्या ‘साथी’चे इज्तेमास्थळी आगमन झाले आहे. गत तीन-चार दिवसांपासून हजारो ट्रक, बस, जीप, कार, टेम्पो, रिक्षा, दुचाकी आदी वाहनांतून लाखोंच्या संख्येने ‘साथी’बांधव पोहोचत आहेत. उपस्थितांसाठी संयोजकांच्या वतीने विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इज्तेमा परिसरात चहा-नाश्ता, जेवण, पिण्याचे शुद्ध पाणी, प्रसाधनगृहे आदींची चांगली व्यवस्था ठेवण्यात आली आहे.अल्लाह व रसूलची शिकवण महत्त्वाची‘फजर’ची नमाज झाल्यानंतर बयाण (प्रबोधन) करताना दिल्ली निजामुद्दीन मरकजचे हजरत मौलाना साद साहब म्हणाले की, इस्लाम धर्मात अल्लाह व रसूलची शिकवण अत्यंत महत्त्वाची आहे. जीवन हे क्षणभंगुर असल्यामुळे मृत्यूनंतर प्रत्येकाने केलेल्या पाप-पुण्याचा हिशोब होणार आहे. त्यामुळे जीवनात प्रत्येकाने चांगली कामे करण्याची गरज असून, पाच वेळा नमाज पढणे, कुरआनचे वाचन करणे तसेच अल्लाहची भक्ती व अल्लाहचे शेवटचे प्रेषित (दूत) मोहंमद पैगंबर (सल्ल.) यांनी दाखविलेल्या मार्गाने जीवन जगण्याचा सल्ला मौलाना साद यांनी दिला. या प्रबोधन कार्यक्रमानंतर मौलाना युसूफ कंधवली यांनीही उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन केले. त्यांनी मोहंमद पैगंबर यांचे विचार आचरणात आणण्याचा सल्ला दिला.मदतीसाठी साथींची फौजइज्तेमासाठी देश-विदेशातून येणाºया भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी अहोरात्र हजारो साथी परिश्रम घेत आहेत. साथींना त्यांच्या शामियान्यापर्यंत पोहोचविणे, वाहतुकीला शिस्त लावणे, आजारी भाविकांना उपचाराची सुविधा उपलब्ध करून देणे आदी सुविधा पुरविण्यासाठी खिदमतगार झटत आहेत. या आदरातिथ्यामुळे इज्तेमाला येणारे भाविक भारावून गेले असून, सुरेख नियोजनामुळे भाविक संयोजकांच्या कार्याची प्रशंसा करीत आहेत.प्रशासनाकडून सुविधांचा आढावाइज्तेमाला येणाºया भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी, चांगले अन्न व इतर सेवा-सुविधा मिळाव्यात, यासाठी उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शिंदे, जिल्हा वैद्यकीय अधिकारी खतगावकर आदींसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, आरोग्य विभाग, महावितरण अन्न व औषधी प्रशासन आदी विभागांचे अधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत.उत्कृष्ट कार्य करणाºया पोलिसांना रिवॉर्डशनिवारी इज्तेमाच्या पहिल्या दिवशी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी भेट देऊन सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेत पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना मार्गदर्शन केले. याठिकाणी ड्रोन कॅमेºयाद्वारे इज्तेमा परिसरावर नरज ठेवली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त यादव यांनी सांगितले. उत्कृष्ट कार्य करणाºया पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना रिवार्ड देणार असल्याचे पोलीस आयुक्त यादव यांनी जाहीर केले.लाखो साथींच्या गर्दीने परिसर फुललाया राज्यस्तरीय इज्तेमासाठी दररोज हजारो वाहनांतून मोठ्या-प्रमाणात मुस्लिम बांधव इज्तेमासाठी आले आहेत. इज्तेमाकडे येणारे रस्ते वाहनांच्या गर्दीमुळे फुलून गेले असून, ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहने थांबवून खिदमतगार व नागरिक या भाविकांना थंडगार पाणी, खाद्यपदार्थ, थंडपेय आदीचा पाहुणचार करून त्यांचे आदरातिथ्य करताना दिसून आले.या इज्तेमास्थळी लाखो साथींनी गर्दी केल्यामुळे इज्तेमाचा परिसर गर्दीने फुलला. एवढा मोठा जनसमुदाय इज्तेमामुळे एकत्रित आल्याने अनेक जण भारावून गेले.तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमइज्तेमासाठी दिल्ली निजामुद्दीन मरकजचे प्रमुख हजरत मौलाना साद साहब यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. शनिवारी पहाटे ‘फजर’च्या नमाजनंतर भाविकांना हजरत मौलाना साद साहब व मौलाना युसूफ कंधलवी यांनी मार्गदर्शन केले. ‘जोहर’च्या नमाजनंतर मौलाना मुश्ताक साहब व मौलाना शौकत साहब यांनी मार्गदर्शन केले. सायंकाळी ‘असर’च्या नमाजनंतर मौलाना सईद कंधवली, तर ‘मगरीब’च्या नमाजनंतर हजरत मौलाना साद साहब यांनी मार्गदर्शन केले. इज्तेमाच्या दुसºया दिवशी २५ फेब्रुवारीला प्रमुख उलेमांचे मार्गदर्शन होणार आहे. यानंतर सायंकाळी सामूहिक विवाहसोहळ्यात जवळपास ३ हजार विवाह लावले जाण्याची शक्यता संयोजकांनी वर्तविली आहे. २६ फेब्रुवारीला पहाटे ‘फजर’च्या नमाजनंतर हाफेज मंजूर साहब यांचे मार्गदर्शन होणार आहे. यानंतर हजरत मौलाना साद साहब यांच्या सामूहिक दुआनंतर इज्तेमाची सांगता होणार आहे.मुस्लिम वसाहती ओसराज्यस्तरीय इज्तेमानिमित्त शहरातील लाखो साथी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपस्थित राहत आहेत. शहराच्या आसपासच्या विविध गावांमधील साथीही रात्रीचा मुक्काम टाळत आहेत. ‘जोहर’, ‘असर’ आणि ‘मगरीब’ची नमाज अदा करून अनेक जण घरी परतत आहेत. काही जण ‘इशां’ची नमाज झाल्यावर इज्तेमाहून निघत आहेत. खिदमतगार बांधव तर २४ तास मुख्य रस्ते, इज्तेमाच्या ठिकाणी उपस्थित राहून सेवा देत आहेत. त्यामुळे मुस्लिमबहुल वसाहती शनिवारी ओस पडल्या होत्या. सोमवारी ‘दुआ’च्या निमित्ताने शहरातील प्रत्येक मुस्लिम बांधव याठिकाणी हजेरी लावणार आहेत. विविध शासकीय कार्यालयांमधील कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, व्यावसायिकांनी आपल्या दैनंदिन कार्यक्रमात बदल करून ३ दिवसांचा स्वतंत्र वेळ काढला आहे.‘खिदमतगार’चे काम पाहून उद्योजकही भारावलेइज्तेमानिमित्त महावीर चौक ते लिंबेजळगावपर्यंत खिदमतगार बांधवांची फौज उभी आहे. वाहतुकीला शिस्त लावणे, वाहनांना वेळीच बाहेर काढणे, अॅम्ब्युलन्स वाहतुकीत न अडकू देता बाहेर काढणे आदी सर्व कामे खिदमतगार बांधव मागील तीन दिवसांपासून करीत आहेत. या कार्याची प्रशंशा वाळूज औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनीही शनिवारी केली. विविध कंपन्यांमधून बाहेर पडणारे कामगार, त्यांच्या बसेसला कुठेच अडथळा निर्माण होणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. इज्तेमाच्या वाहतुकीचा वाळूज औद्योगिक वसाहतीवर कोणताही परिणाम झाला नाही, हे विशेष.
राज्यस्तरीय इज्तेमाला औरंगाबादेत उत्साहात सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:20 AM
मागील अनेक महिन्यांपासून मुस्लिम बांधव चातकाप्रमाणे ज्या इज्तेमाची वाट पाहत होते त्याला शनिवारी ‘फजर’च्या नमाजनंतर दिल्ली मरकजचे प्रमुख मौलाना साद साहब आणि मौलाना युसूफ कंधलवी यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. इज्तेमाच्या पहिल्याच दिवशी लाखो साथींनी हजेरी लावली. उद्या इज्तेमाच्या दुसºया दिवशी आणखी साथी येणार आहेत.
ठळक मुद्देअल्लाह व रसूलची शिकवण महत्त्वाची -हजरत मौलाना साद साहब