यानंतर सुमन हॉस्पिटलमध्ये झालेल्या परिसंवादात डॉक्टरांनी आपले मत मांडले. गंभीर रुग्णांकडे तत्काळ लक्ष द्यावे, गंभीर आजारी रुग्णाच्या तब्येतीची नातेवाइकांना नियमित माहिती द्यावी, रुग्ण व नातेवाइकांना विश्वासात घेऊन उपचार करावे, आदींवर चर्चा झाली. यात धनवंतरी डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नीलेश मिरकर, जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन पाटील यांनी मार्गदर्शन केले. डॉ. शेखर दौड यांनी आभार मानले. यावेळी डॉ. प्रकाश नवाल, शकील खान, गणेश सपकाळ, राहुल कुलकर्णी, अभिलाष गोलेचा, संतोष शिंदे, विशाल आकाते, सोपान म्हस्के, विनोद लोखंडे, धनंजय मावरे, गोकुलचंद बाफना, राहुल घोडके, सुधाकर हासे, महेश बनसोडे, इब्राहिम शेख, योगेश काकडे, भाऊसाहेब तायडे, संजय तायडे, आशिष पाटील, सचिन पंडित, विकास गोठवाल, सुहास जगताप, जुनेद शेख, कय्युम, शाहिद, आदी डॉक्टरांची उपस्थिती होती.
---- फोटो