लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पैठण येथील रुग्णालयास नूतनीकरण नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी डॉक्टरांकडून तीन हजार रुपये लाच घेताना जिल्हा सामान्य रुग्णालयातील सांख्यिकी सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सोमवारी (दि.९) दुपारी करण्यात आली.संतोष रामचंद्र जेऊरकर (५२, रा. स्वातंत्र्यसैनिक कॉलनी, नागेश्वरवाडी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबई नर्सिंग अॅक्टनुसार दर तीन वर्षांनंतर रुग्णालयांना त्यांच्या नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे पैठण येथील डॉ. मदनलाल मानधने यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या रुग्णालयाच्या नोंदणी प्रमाणपत्रासाठी बिडकीन ग्रामीण रुग्णालयामार्फत औरंगाबादेतील जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावासंदर्भात मानधने यांनी सांख्यिकी सहायक जेऊरकर यांच्याशी दहा दिवसांपूर्वी संपर्क साधला होता.
३ हजारांची लाच घेताना सांख्यिकी सहायक अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 1:30 AM