शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

शिवरायांचा पुतळा : मनपाने नाही, तर बाजार समितीने करून दाखविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 7:22 PM

एक कोटी रुपये खर्च करून नवीन पुतळा घेण्याचे निश्चित करण्यात आले. या सर्व प्रक्रियेत अडीच वर्षे कधी निघून गेले

ठळक मुद्देअडीच वर्षांनंतरही महापालिकेच्या पुतळा उभारणीच्या कामात प्रगती नाहीकृषी उत्पन्न बाजार समितीने सहा महिन्यांत पुतळा उभारून लोकार्पणही केले. 

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा क्रांतीचौक येथे नवीन पद्धतीने उभारण्याचा निर्णय तब्बल अडीच वर्षांपूर्वी औरंगाबाद महापालिकेने घेतला होता. मागील अडीच वर्षांमध्ये महापालिकेला पुतळ्याच्या कामात किंचितही प्रगती करता आलेली नाही. त्यामुळे तमाम शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महापालिकेला जे जमले नाही ते औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीने अवघ्या सहा महिन्यांमध्ये करून दाखविले. सहा महिन्यांत शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून मागील महिन्यात त्याचे लोकार्पणही करण्यात आले. 

क्रांतीचौक येथे उड्डाणपूल उभारण्यात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खाली दिसू लागला. तेव्हापासून शिवप्रेमींनी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवावी, अशी मागणी लावून धरली होती. तीन वर्षांपूर्वी शहरातील शिवप्रेमींसह मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेत येऊन महापौरांना घेराव घातला होता. महापालिकेकडे निधी नसेल तर तसे सांगून टाकावे शिवप्रेमी स्वत:च्या खिशातील पैसे लावून पुतळ्याची उंची वाढवतील, असेही सांगण्यात आले होते. त्यावेळी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी हा विषय अस्मितेचा समजून महापालिका स्वत: पैसा खर्च करेल, असे आश्वासन दिले होते. पुतळ्याची उंची वाढविण्याचा निर्णय झाला. निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. कंत्राटदार निश्चित करण्यात आला. मोठा गाजावाजा करीत महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी भूमिपूजनही केले. मात्र, त्यानंतर कामामध्ये कोणतीही प्रगती दिसून आली नाही. एकीकडे कंत्राटदार काम करण्यास तयार नाही, तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नवीन बसवण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला. नवीन पुतळ्यासाठी पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. 

एक कोटी रुपये खर्च करून नवीन पुतळा घेण्याचे निश्चित करण्यात आले. या सर्व प्रक्रियेत अडीच वर्षे कधी निघून गेले, हे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनाही कळाले नाही. मागील आठवड्यात मराठा क्रांती मोर्चा आणि शहरातील शिवप्रेमींनी पुन्हा एकदा महापालिकेवर जोरदार हल्लाबोल केला. पुतळ्याचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार, असा जाब विचारण्यात आला. त्यानंतर महापालिकेला जाग आली. कंत्राटदाराला वेळोवेळी बिल अदा करण्याचे आश्वासन देऊन कामाला सुरुवात करण्यात आली.

निर्णय वेळोवेळी बदलले, निधीची कमतरताछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामाला अडीच वर्षे पूर्ण झाले, ही वस्तुस्थिती आहे. कामास विलंब होण्यास अनेक कारणे आहेत. या कामामध्ये वेळोवेळी निर्णय बदलत गेले. त्याचप्रमाणे महापालिकेत निधीची कमतरता होती. आता कोणताही अडथळा या कामात येणार नाही. काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येईल.  - एस.डी. पानझडे, शहर अभियंता, महापालिका. 

असे झाले बाजार  समितीत कामशिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी संचालक मंडळाने डिसेंबर २०१८ ला निर्णय घेतला. १७ मे २०१९ रोजी पुतळा बनविण्यासाठी शिल्पकाराला आॅर्डर दिली. १० जून २०१९ रोजी राज्य सरकारच्या परवानगीसाठी प्रस्ताव दाखल केला. कला संचालनालयाची  ९ डिसेंबर १९ रोजी परवानगी मिळाली. त्यानंतर २३ डिसेंबर २०१९  रोजी पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांनादेखील मंजुरीसाठी प्रस्ताव दिला. राज्य शासनाची परवानगी १० जून २०२० रोजी मिळाली. लॉकडाऊनमुळे या कामाला जवळपास ४ महिने उशीर झाला. - राधाकिसन पठाडे, (माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती.) 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादkranti chowkक्रांती चौकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका