शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

मुद्रा कर्जाचा अर्जही मिळेना, औरंगाबादमधील स्थिती; बँकांना कर्जफेड न होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 5:23 AM

प्रधानमंत्री मुद्रा योजनेची ‘गरजेनुसार कर्ज, अपेक्षेनुसार प्रगती’ अशी जाहिरात केली जात असली तरी येथे मुद्रा कर्ज योजनेचा अर्जही देण्यास बँकेचे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत.

औरंगाबाद : प्रधानमंत्री मुद्रा योजनेची ‘गरजेनुसार कर्ज, अपेक्षेनुसार प्रगती’ अशी जाहिरात केली जात असली तरी येथे मुद्रा कर्ज योजनेचा अर्जही देण्यास बँकेचे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत.बेरोजगार युवक बँकांमध्ये खेटे मारून वैतागले आहेत. काहींनी तर कर्ज घेण्याचा विचारही सोडला आहे. बँक आॅफ महाराष्ट्रकडे जिल्हा व शाखानिहाय कर्जवाटप केल्याची माहिती उपलब्ध नाही.सुरवातीला दोन वर्ष बँकांकडून मुद्रा कर्ज पुरवठा केला; पण नंतर कर्ज सोडाच; अर्जही देण्यास टाळाटाळ केली जात आहे. नुकतीच जिल्हाधिकाºयांनी मुद्रा बँक योजना समन्वय समितीची बैठक घेतली. त्यात किती बँकांनी मुद्रा कर्ज वाटप केले, त्याची माहिती मिळाली नाही. यासंदर्भात अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक प्रदीप कुतवळ यांनी औरंगाबाद जिल्ह्याऐवजी, राज्याची एकूण आकडेवारी सांगितली.राज्यात १६ हजार १८१ कोटी रुपयांचे कर्जवाटपराष्ट्रीयीकृत व खासगी बँकांचे मिळून शिशू योजनेंतर्गत १५ लाख ९६ हजार ९९५ खातेदारांना एकूण ३ हजार ९३६ कोटी ७५ लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले. किशोर योजनेंतर्गत १ लाख ८ हजार १६३ खातेदारांना ९ हजार ६४० कोटी ६० लाख, तर तरुण योजनेत ३५ हजार २०८ खातेदारांना २ हजार ६०४ कोटी ९५ लाख रुपये, असे एकूण १६ हजार १८१ कोटी ३० लाखांचे मुद्रा कर्ज वाटप केले आहे.गुरुवारी बँक आॅफ बडोद्याच्या बजरंग चौक शाखेत गेलो होतो. मुद्रा कर्ज योजनेचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. अशी उत्तरे तेथील अधिकाºयांनी दिली. मागील आठवडाभरापासून अन्य पाच राष्ट्रीयकृत बँकेतही असे उत्तर मिळाले.- विनोद बनकर, बेरोजगार युवककर्जवाटपाचे उद्दिष्टच नाहीमुद्रा कर्जाचे वर्षभरात किती वाटप करायचे याचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले नाही. तरीही आमचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याची खोटी माहिती नागरिकांना दिली जात आहे. कर्ज बुडविले जाईल या भीतीने बँका अर्ज देत नाहीत. यात प्रामाणिक व गरजूंनाही कर्ज मिळेनासे झाले आहे. कर्ज सोडाच; पण अर्जही बँक देत नसून याची तक्रार आम्ही पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे. - राजेश मेहता, मुद्रा योजना संयोजक (भाजपा)

टॅग्स :bankबँक