औरंगाबाद : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत आहेत. सुमारे ४० टक्के ऊस शेतात उभा असल्याने शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी वाढू लागल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील ७ साखर कारखानदारांना गाळपक्षमता वाढविण्याचे आदेश देऊनही अजून समाधानकारक चित्र सध्या दिसत नाही. जिल्ह्यात सुमारे २३ हजार हेक्टर एवढे उसाचे क्षेत्र सध्या आहे.
शिल्लक ऊस व उपाययोजनापुढच्या ६० दिवसांत कारखाने सुरू राहिले तर किती गाळप होईल, याचा अंदाज बांधण्यात आला असून, ३१ मेनंतरदेखील कारखाने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले. ऊसतोडणी यंत्र पश्चिम महाराष्ट्रातून जिल्ह्यात आणण्यासाठी साखर आयुक्तांशी चर्चा करण्यात येणार आहे. अहमदनगर, सोलापूरकडून गाळप बंद झाले तर अडचणी निर्माण होतील, त्यासाठी तिकडील कारखाने मेअखेरपर्यंत चालविणे हा एक उपाय आहे.
विभागीय आयुक्तांचे आदेश असे३१ मेपर्यंत उसाचे गाळप झाले पाहिजे, अशा सूचना कारखानदारांना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केल्या आहेत. तसेच गाळप वाढविण्यासाठी तीन शिफ्टमध्ये कारखाने चालविण्याच्या आदेश दिले आहेत. ऊसतोडीसाठी माणसे नसतील तर शेजारच्या जिल्ह्यातून ऊसतोड यंत्र मागवून घेण्याचे कारखानदारांना सांगण्यात आले आहे. ऊस संपेपर्यंत कारखाने बंद करायचे नाहीत, असे आदेश त्यांनी दिले.
एकूण कारखाने- ७मिळालेला भाव-सरासरी २३०० रुपये टनजिल्ह्यातील उसाचे क्षेत्र : २३ हजार हेक्टरएकूण गाळप: २२ लाख मेट्रिक टन