लोकमत न्यूज नेटवर्कदेवगाव रंगारी : औरंगाबादहून नाशिक व नाशिकहून औरंगाबादकडे जाणाºया एसटी बस देवगाव रंगारी बसस्थानकात येत नसल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. औरंगाबादहून सुटणा-या बसलाही वेळापत्रक नसल्याने प्रवाशांची अडचण होत आहे.वरिष्ठ अधिकाºयांनी दखल घेऊन येथील बसस्थानकात एसटीला थांबण्याचे आदेश द्यावते, औरंगाबादहून सुटणाºया एसटीला वेळ नेमून द्यावी, अशी मागणी प्रवाशांच्या वतीने करण्यात आली आहे.देवगाव रंगारी येथील बसस्थानक गावात आहे. देवगाव फाटा ते बसस्थानकाचे अंतर जळपास अर्धा कि़मी. असून बसला गावात येण्यासाठी कोणतीच अडचण नाही. मात्र, तरीही औरंगाबादहून नाशिक येथे जाणाºया आणि नाशिक येथून औरंगाबादला येणाºया बस येथील स्थानकात थांबत नाही. याबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणीदेवगाव रंगारीची लोकसंख्या जवळपास १५ हजार आहे. या गावातील २००-३०० विद्यार्थी, कंपनीत काम करणारे कामगार, सरकारी नोकरदार आदी आपापली कामे आटोपून सायंकाळी औरंगाबादहून देवगाव रंगारीला जातात. मात्र, येथील स्थानकातून बस वेळेवर निघत नसल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी दखल घेऊन देवगाव रंगारी येथे बस थांबविण्याचे आदेश द्यावेत, तसेच औरंगाबाद तसेच नाशिकहून येणाºया वाहनांच्या वेळा निश्चित कराव्या, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
एसटीला देवगाव रंगारी बसस्थानकाचे वावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:49 PM