ग्रामपंचायत निवडणूकीचा सोमवारी निकाल जाहीर होणार असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेसाठी शहर आणि जिल्ह्यात ड्राय डे जाहीर करण्यात आला होता. चढ्या दराने विकण्याच्या उद्देशाने बनावट देशी दारू एकजण कारमधून नेत असल्याची माहिती उत्पादन शुल्क चे निरीक्षक अरुण चव्हाण यांना मिळाली. यानंतर सोमवारी सकाळी अधिकारी व कर्मचार्यांच्या पथकाने हर्सूल ते जटवाडा रस्त्यावर सापळा रचला असता संशयित कार थांबविली. यावेळी त्यांना पाहून आरोपी कार सोडून पळून जाऊ लागले असता अधिकारी, कर्मचाऱ्यानी त्याला लगेच पकडले. यावेळी कारची झडती घेतली असता कारमध्ये बनावट देशी दारूच्या २० बॉक्स आढळून आले. सुमारे ४९ हजार ९२० रुपयांची दारू आणि २ लाखाची कार जप्त करण्यात आले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवस कोठडी सुनावली.
=======================
भंगारातील बाटल्यामध्ये बनावट भरली दारू
आरोपीकडून जप्त केलेल्या दारूच्या बाटल्या भंगारातील असल्याचे समोर आले. बाटल्यामध्ये बनावट दारू भरलेली आढळून आली. बाटल्यांवरील लेबलवर वेगवेगळी बॅच क्रमांक आहे.