लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बाथरूममध्ये मोबाईल लपवून महिलेचे चित्रीकरण करणाऱ्या एका संशयितावर सदर बाजार पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी संभाजीनगर परिसरात हा प्रकार घडला.पोलीस सूत्रांनी सांगितले, संभाजीनगरातील कांबळे गल्ली भागात राहणारी पीडित महिला दुपारी स्रान करण्यासाठी बाथरुममध्ये गेली. दरम्यान, बाथरूमच्या मागील बाजूच्या खिडकीत महिलेस मोबाईल असल्याचे लक्षात आले. मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रीकरण सुरू असल्याचे दिसून आले. महिलेने हा प्रकार आपल्या पतीला सांगितला. पतीने खिडकीतील मोबाईल ताब्यात घेतला. दरम्यान, याच परिसरात राहणारा मंगेश र्इंचाळ हा काही वेळापूर्वी घराकडे आला होता. त्यानेच वाईट हेतूने चित्रीकरण करण्यासाठी मोबाईल ठेवल्याचा संशय पीडित महिलेच्या पतीस आला.
बाथरूममध्ये चोरून चित्रीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:08 AM