'महागाईचा भस्मासूर रोखा'; इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कॉंग्रेसतर्फे पेट्रोल पंपांवर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 02:42 PM2021-06-07T14:42:26+5:302021-06-07T15:01:52+5:30

शहरातील तीन विधानसभा मतदार संघातील प्रत्येकी तीन अशा ९ पेट्रोल पंपांवर एकाचवेळी सकाळी 11 वाजता ही निदर्शने करण्यात आली.

'Stop inflation'; Protests at petrol pumps by Congress against fuel price hike | 'महागाईचा भस्मासूर रोखा'; इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कॉंग्रेसतर्फे पेट्रोल पंपांवर निदर्शने

'महागाईचा भस्मासूर रोखा'; इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कॉंग्रेसतर्फे पेट्रोल पंपांवर निदर्शने

googlenewsNext
ठळक मुद्दे‌शहर कॉंग्रेसतर्फे चुनीलाल पेट्रोल पंपावर निदर्शने करण्यात आली.क्रांतीचौक पेट्रोल पंपावरही असेच आंदोलन करुन लोकांचे लक्ष वेधण्यात आले.

औरंगाबाद: पेट्रोल, डिझेल, गॅस व खाद्यतेलांच्या वाढत्या दरवाढीच्या निषेधार्थ कॉंग्रेसतर्फे आज राज्यभर पेट्रोल पंपांवर निदर्शने करण्यात आली. शहरातील तीन विधानसभा मतदार संघातील प्रत्येकी तीन अशा ९ पेट्रोल पंपांवर एकाचवेळी सकाळी 11 वाजता ही निदर्शने करण्यात आली.

औरंगाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीने औरंगाबादेत राज पेट्रोल पंपावर हे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या हातात महागाईचा भस्मासूर म्हणून नरेंद्र मोदी यांना चित्रित करण्यात आलेले फलक होते. पेट्रोल,डिझेलची दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, केंद्र सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, आपल्या देशातील लस परदेशी पाठवणाऱ्या सरकारचा निषेध असो,अशा घोषणांनी पेट्रोल पंप परिसर दणाणून सोडण्यात आला होता.

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ कल्याण काळे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. प्रदेश सरचिटणीस रवींद्र काळे, जिल्हा उपाध्यक्ष किरण पा डोणगावकर, तालुकाध्यक्ष रामुकाका शेळके, भाऊसाहेब जगताप, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सरोज मसलगे,दिपाली मिसाळ,राहुल सावंत, संजय जगताप, सर्जेराव चव्हाण,अतिष पीतळे, मोहित जाधव,सचिन शिरसाट, अनुराग शिंदे, अशोक डोळस,गौरव जैस्वाल,पप्पुराज ठुबे ,प्रकाश सानप, मुसा पटेल,अंकुश चौधरी,सुभाष पांडभरे, मोसिन खान,मजहर पटेल, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष जयप्रकाश नारनवरे ,नदीम शेख, हबीब शेख,बबन जगताप, शाम गावंडे ,विठ्ठल कोरडे,संतोष शेजूळ,अर्जुन शेळके,सुरेश शिंदे,विजय जाधव,बाबासाहेब बोरचाटे,शुभम साळवे,संदीप मनोहर आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.

Web Title: 'Stop inflation'; Protests at petrol pumps by Congress against fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.