औरंगाबाद: पेट्रोल, डिझेल, गॅस व खाद्यतेलांच्या वाढत्या दरवाढीच्या निषेधार्थ कॉंग्रेसतर्फे आज राज्यभर पेट्रोल पंपांवर निदर्शने करण्यात आली. शहरातील तीन विधानसभा मतदार संघातील प्रत्येकी तीन अशा ९ पेट्रोल पंपांवर एकाचवेळी सकाळी 11 वाजता ही निदर्शने करण्यात आली.
औरंगाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीने औरंगाबादेत राज पेट्रोल पंपावर हे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या हातात महागाईचा भस्मासूर म्हणून नरेंद्र मोदी यांना चित्रित करण्यात आलेले फलक होते. पेट्रोल,डिझेलची दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, केंद्र सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, आपल्या देशातील लस परदेशी पाठवणाऱ्या सरकारचा निषेध असो,अशा घोषणांनी पेट्रोल पंप परिसर दणाणून सोडण्यात आला होता.
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ कल्याण काळे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. प्रदेश सरचिटणीस रवींद्र काळे, जिल्हा उपाध्यक्ष किरण पा डोणगावकर, तालुकाध्यक्ष रामुकाका शेळके, भाऊसाहेब जगताप, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सरोज मसलगे,दिपाली मिसाळ,राहुल सावंत, संजय जगताप, सर्जेराव चव्हाण,अतिष पीतळे, मोहित जाधव,सचिन शिरसाट, अनुराग शिंदे, अशोक डोळस,गौरव जैस्वाल,पप्पुराज ठुबे ,प्रकाश सानप, मुसा पटेल,अंकुश चौधरी,सुभाष पांडभरे, मोसिन खान,मजहर पटेल, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष जयप्रकाश नारनवरे ,नदीम शेख, हबीब शेख,बबन जगताप, शाम गावंडे ,विठ्ठल कोरडे,संतोष शेजूळ,अर्जुन शेळके,सुरेश शिंदे,विजय जाधव,बाबासाहेब बोरचाटे,शुभम साळवे,संदीप मनोहर आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.