कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालक यांना राज्य सरकारकडून एक हजार पाचशे रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच अनुदान वाटपाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरून बँकांमध्ये खाते उघडावयाचे आहे. परंतु बँकांकडून प्रत्येक परवानाधारकांना खाते उघडण्याची मागणी करत आहे. सध्या कोरोना या महामारीच्या काळात रिक्षाचालकांकडून ५०० रुपये भरण्यास व नवीन खाते उघडण्यास सांगण्यात येत आहे. तसेच राष्ट्रीयीकृत बँक पाचशे रुपये भरल्याशिवाय खाते उघडू देणार नाही, अशी तंबी देत आहे. अशावेळी आणि कोरोना महामारीच्या काळात रिक्षावाले पैसे कुठून आणणार व खाते कसे उघडणार, असा सवाल काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष शेख अथर, उपाध्यक्ष अब्दुल कय्यूम, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजफ्फरखान पठाण, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव आमेर अब्दुल सलीम, असंघटीत काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजू देहाडे, शहर महासचिव शेख शफीक सरकार, साजेद कुरेशी आदींनी केला आहे.
रिक्षाचालकांचे फायनान्स कंपन्यांचे हप्ते थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:05 AM