राजूर : तीर्थक्षेत्र राजूर येथील विजेचे भारनियमन खास बाब म्हणून बंद करून कायमस्वरूपी सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी व्यापारी ग्रामस्थांनी दि.११ रोजी राजूर येथे रास्ता रोको केला. यामुळे अर्धा तास वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या.अखेर नायब तहसीलदार डोळस यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.राजूर येथे दुपारी अकरा ते तीन व रात्री सात ते दहा वाजेपर्यंत भारनियमन केले जाते. तसेच कनिष्ठ अभियंता शंकरवाल यांच्या हलगर्जीपणामुळे राजुरात भारनियमनाव्यतिरिक्त सतत विजेचा लपंडाव सुरू असतो. यामुळे ग्रामस्थांसह व्यापारी त्रस्त झाले आहेत. तसेच राजुरेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अंधाराचा सामना करावा लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विजेच्या लपंडावामुळे राजुरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारनियमनाला त्रस्त नागरिकांनी रास्ता रोकोचे आयोजन केले होते. सकाळी अकरा वाजता व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून रास्ता रोकोत सहभाग घेतला होता. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ थोटे, रामेश्वर टोणपे, डॉ.वैजीनाथ ढोरकुले यांनी आपल्या भाषणातून महावितरण कंपनीने तातडीने भारनियमन बंद करून जनतेचा छळ थांबवावा, अशी मागणी केली. तसेच माजी सभापती शिवाजीराव थोटे यांनी येत्या आठ दिवसांत भारनियमन बंद न झाल्यास वीज उपकेंद्रासमोर ग्रामस्थांसह धरणे आंदोलन करू, असा इशारा दिला. माजी सरपंच रामदास तळेकर यांनी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कुठेही भारनियमन नसताना राजूरलाच का? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी नायब तहसीलदार एस.जी.डोळस यांना निवेदन देण्यात आले. प्रभारी कनिष्ठ अभियंता पाटील यांनी सदर बाब वरिष्ठांच्या कानावर घालून येत्या आठ दिवसांत राजूर भारनियमनमुक्त करू, असे आश्वासन दिले. दरम्यान, राजूर येथील भारनियमन तात्काळ बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरत आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.आंदोलनात तुळजा भवानी पतसंस्थेचे चेअरमन बाबूराव खरात, माजी सभापती शिवाजीराव थोेटे, जगन्नाथ थोटे, भाऊसाहेब काकडे, उपसरपंच मुसाशेठ सौदागर, विठ्ठलराव टेपले, मुकेश अग्रवाल, सारंगधर बोडखे, डॉ. वैजीनाथ ढोरकुले, रामेश्वर टोपणे, गणेश इगेवार, नरपतसिंंह शेखावत, रामदास तळेकर, भाऊसाहेब भुजंंग, प्रशांत दानवे, सतिशआप्पा दारूवाले, पुुुंडलिकराव पुंगळे, बबन सहाने, माधव जायभाये यांच्यासह नागरिक, व्यापारी मोठया संंख्येने सहभागी झाले होते. (वार्ताहर)सकाळी अकरा वाजता व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून रास्तारोकोत सहभाग घेतला होता. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ थोटे, रामेश्वर टोणपे, डॉ.वैजीनाथ ढोरकुले यांनी आपल्या भाषणातून महावितरण कंपनीने तातडीने भारनियमन बंद करून जनतेचा छळ थांबवावा, अशी मागणी केली. महावितरणकडूनही याबाबतीत वारंवार उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. भारनियमनामुळे भाविकांसह ग्रामस्थांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
राजुरात भारनियमनाच्या विरोधात रास्ता रोको
By admin | Published: June 12, 2014 12:56 AM