लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांमधून पीक विमा स्वीकारला जात नसल्याने संतप्त शेतकºयांनी २ आॅगस्ट रोजी सकाळी ११़३० ते दुपारी २.४५ पर्यंत येथील नांदेड-पुणे राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले़ त्यामुळे दोन्ही बाजुला दीड किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत विमा स्वीकारण्यास नकार दिल्याने शेतकरी संतप्त झाले़ यावेळी काही राष्ट्रीयकृत बँकांमधून विमा रक्कम स्वीकारली जात होती़ मात्र दुपारी या बँकांना आॅनलाईन विमाच भरला जावा, असा निरोप आल्याने बँकांमधून विमा स्वीकारणे बंद करण्यात आले़ त्यामुळे गोंधळ वाढला़ संतप्त शेतकºयांनी जोरदार घोषणाबाजी केली़ आंदोलनामुळे बसस्थानक ते पोलीस ठाण्यापर्यंत आणि दुसºया बाजुला परळी नाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ तहसीलदार आसाराम छडीदार, पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ यांनी दोन वेळा मध्यस्थी करून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला़ मात्र बँकांनी आॅफलाईन विमा भरून घ्यावा, अशी मागणी रेटून धरली़ दुपारी २़४५ वाजेच्या सुमारास राखीव पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला़ डीवायएसपी नारायण शिरगावकर, निरीक्षक सोपान सिरसाठ, सहाय्यक निरीक्षक सुरेश थोरात, फौजदार रवि मुंडे, राहुल बहुरे आदींसह पोलीस कर्मचाºयांचा ताफा ठाण्याबाहेर येताच जमाव पांगला आणि साडेतीन तासांपासून रोखलेला महामार्ग मोकळा झाला़ त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़
गंगाखेडमध्ये तीन तास शेतकºयांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 12:50 AM
जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांमधून पीक विमा स्वीकारला जात नसल्याने संतप्त शेतकºयांनी २ आॅगस्ट रोजी सकाळी ११़३० ते दुपारी २.४५ पर्यंत येथील नांदेड-पुणे राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले़ त्यामुळे दोन्ही बाजुला दीड किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
ठळक मुद्दे परळी नाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा