लोकमत न्यूज नेटवर्कपालम : गंगाधर पळसकर या युवकाच्या खून प्रकरणाच्या तपासाला गती देऊन दोषींना अटक करावी, या मागणीसाठी १५ जुलै रोजी दुपारी १२ वाजता मोर्चा काढून राज्य मार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यामुळे एक तास वाहतूक ठप्प झाली होती. अंजनवाडी शिवारात १८ जून रोजी कवटी व हाडे सापडली होती. यानंतर पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले. एक महिना उलटला तरी तपास संथ गतीने सुरु आहे. यामुळे अंजनवाडी येथील ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली आहेत. या तपासाला गती द्यावी, या मागणीसाठी पालम तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. लोहा रस्त्यावरील पेट्रोलपंपापासून अंजनवाडी येथील महिला, युवक, वृद्ध यांनी मोर्चास सुरुवात केली. मुख्य चौकामध्ये ग्रामस्थ व सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी १ वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी गणेशराव रोकडे, लक्ष्मणराव रोकडे, शेख मुस्तफा, सुभाष धुळगुंडे, गोविंद थिटे, निवृत्ती हत्तीअंबिरे, वैजनाथ हत्तीअंबिरे, पांडुरंग होळगे, सूर्यकांत पळसकर, शिवाजी वाडेवाले, विनायक वाडेवाले, हनुमंत पौळ, संजय थिटे, रहेमतुल्ला पठाण, भागवत बाजगीर, डॉ.बडे सहाब शेख आदी सहभागी झाले होते.
पालम येथे रास्ता रोको
By admin | Published: July 15, 2017 11:44 PM