सिल्लोड : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सिल्लोड शहरात भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शनिवारी एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकरी विरोधी ते तीन कायदे रद्द करावे, आंदोलनकारी शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, डिझेल,पेट्रोल दरवाढ मागे घेण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन सिल्लोड तहसीलचे पेशकार मोकासे यांना देण्यात आले.
यावेळी काँम्रेड राम बाहेती, काँ. सय्यद अनिस, काँ. बाबुराव पठाडे, शेख बाबु, शेख इसाक, बाळु शिन्दे, जाबेर पठाण, अशोक गायकवाड, अरुण आरके, सय्यद परवेज, फेरोज पठाण, कैसर पठाण, शेख इमरान, शेख साजिद, नारायण देशमुख, रमेश पांढरे, उमेश साळवे, गजानन सोनवणे, रामदास काकडे, सय्यद अन्वर, आसेफ कुरैशी, सौरभ पवार, शेख युसूफ, अजहर पठाण, माया कुरैशी, राऊत बाबा, गोविंदा कापरे, संकेत मानकापे, शेख कैसर, शेख जुबेर, शेख रहेमान, हमाल युनियन, ए.आय.एस.एफ, व ए.आय.वाय.एफचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आदोलनात सहभागी झाले होते. पोलिस निरिक्षक राजेंद्र बोकडे यांच्या उपस्थितीत आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. पोलिस उपनिरिक्षक अंधारे, पो. काँ. खाडे, बुधवंत आदींचा समावेश होता. रास्ता रोको आंदोलनामुळे औरंगाबाद जळगाव हायवेवर वाहनाची मोठी रांग लागली होती.
फोटो : सिल्लोड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कम्युनिस्ट पक्षातर्फे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.