शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बंडखोराला साथ; सुनील केदारांचा अजब दावा
2
पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत
3
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
4
भर सभेतच असदुद्दीन ओवैसींना पोलिसांनी दिली नोटीस; त्यानंतर काय घडलं? 
5
Children's Day 2024: या बालदिनी LIC च्या 'या' चिल्ड्रन स्कीममध्ये करा गुंतवणूक, मुलांचं भविष्य होईल सुरक्षित
6
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
7
Exclusive: 'रात्रीस खेळ चाले' ते थेट 'सिंघम अगेन'! अभिनेत्री व्हायचं नव्हतं, मग बॉलिवूडपर्यंत कशी पोहोचली भाग्या?
8
Suzlon Energy Share Price : ३०% च्या घसरणीनंतर Suzlon Energy च्या शेअरमध्ये तुफान तेजी, लागलं अपर सर्किट; कारण काय?
9
Dev Diwali 2024: आज देवदिवाळी, उद्या त्रिपुरी पौर्णिमा, कार्तिक स्नान तसेच तुलसी विवाह समाप्ती!
10
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
11
'रंग माझा वेगळा'मधील 'दिपा'साठी सावळ्या मुलीलाच कास्ट का केलं नाही? लेखक खरं कारण सांगत म्हणाला...
12
Niva Bupa Health IPO : ₹७४ च्या शेअरनं दिला ६% लिस्टिंग गेन; पण जून तिमाहीत थंड होता निवा बुपाचा व्यवसाय, शेअरची स्थिती काय?
13
Children's Day 2024: मुलांच्या नावावर गुंतवणुकीचे ८ बेस्ट पर्याय; शिक्षण ते लग्न चिंताच सोडा
14
'सिंघम अगेन'सोबत टक्कर टाळता आली असती का? 'भूल भूलैय्या ३'चे निर्माते म्हणतात- "मी प्रयत्न केले पण.."
15
केंद्रीय मंत्र्यांनी केलं वाचनालयातील पंख्याचं उदघाटन, आता फोटो होताहेत व्हायरल   
16
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' वस्तूंचे करा दान, मिळवा इच्छापूर्तीचे वरदान!
17
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
18
Share Market Today : घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
19
अमित ठाकरे यांना मतदान का करावे? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' 10 मुद्दे
20
Richest Indian in Canada : कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांना पोलिसांनी गंगापूर येथेच रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 4:50 PM

पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन काही वेळानंतर मुक्त केले. 

ठळक मुद्देगंगापूर फाट्यावर पोलीस बंदोबस्त असल्यामुळे येणाऱ्या प्रत्येक आंदोलकाला येथे थांबवण्यात आले.

गंगापूर : मराठा क्रांती मोर्चातर्फे ‘बलिदान ते आत्मबलिदान’ आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी आंदोलन स्थळापासून ७ किमी  अंतरावर गंगापूर फाटा येथे ताब्यात घेतले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळपासूनच पोलिसांनी  गोदावरी नदीवरील आंदोलन स्थळाकडे जाणारे सर्व मार्ग बंद केले होते. त्यामुळे एकही आंदोलक गोदावरी नदीवरील स्मृती स्थळापर्यंत पोहोचू शकला नाही. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन काही वेळानंतर मुक्त केले. 

गंगापूर फाट्यावर पोलीस बंदोबस्त असल्यामुळे येणाऱ्या प्रत्येक आंदोलकाला येथे थांबवण्यात आले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास आंदोलकांना तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी ३० जुलैला मुंबई येथे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना मागण्यांवरील चर्चेसाठी बोलावले असल्याचे पत्र दिले. दरम्यान, आंदोलकांना ताब्यात घेऊन काही वेळानंतर मुक्त केले. यानंतर शहरातील एका कार्यालयात काकासाहेब शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. 

यावेळी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील गंगापूर येथे हजर होत्या. तसेच  अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे, उपविभागीय अधिकारी संदीप सानप, डीवायएसपी संदीप गावित, पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव, मच्छिंद्र सुरवसे यांच्यासह पैठण, वैजापूर आणि गंगापूर येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा बंदोबस्त होता.

वाहतूक खोळंबली  दरम्यान, औरंगाबाद-पुणे या मार्गावरील प्रवाशांची मोठी अडचण झाली.  ठिकठिकाणी नियमित माल वाहतूक करण्याऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहनचालकांनी १०० ते १५० किलोमीटरचा फेरा करण्यापेक्षा दिवसभर या ठिकाणी थांबून सायंकाळी पुढे मार्गस्थ होऊ, असे स्पष्ट केले. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस