शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

पैठणमध्ये नाथषष्ठी सोहळ्याची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:38 AM

खडकी सोडियेला मोटा। अजीचा दहीकाला गोमटा ।। घ्यारे घ्यारे दहीभात। आम्हा देतो पंढरीनाथ ।। ऐन सूर्यास्ताच्या समयी टाळ-मृदंगाच्या गजरात भानुदास-एकनाथांच्या जयघोषात नाथ मंदिरातील काल्याची दहीहंडी नाथवंशज ह.भ.प. रावसाहेब महाराज यांच्या हस्ते फोडण्यात आली.

पैठण :खडकी सोडियेला मोटा।अजीचा दहीकाला गोमटा ।।घ्यारे घ्यारे दहीभात।आम्हा देतो पंढरीनाथ ।।ऐन सूर्यास्ताच्या समयी टाळ-मृदंगाच्या गजरात भानुदास-एकनाथांच्या जयघोषात नाथ मंदिरातील काल्याची दहीहंडी नाथवंशज ह.भ.प. रावसाहेब महाराज यांच्या हस्ते फोडण्यात आली. काल्याचा प्रसाद व नाथ समाधीचे दर्शन घेऊन वारकरी तृप्त मनाने परतीच्या मार्गावर चालते झाले. दरम्यान, आज नाथषष्ठीस आलेल्या वारकºयांनी विविध फडांवर काल्याचे कीर्तन करीत प्रसादाचे वाटप करून पैठणनगरीचा निरोप घेतला. नाथषष्ठीच्या इतिहासात प्रथमच यंदा काला हंडीसाठी लाखोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावून गर्दीचा विक्रम नोंदवला.शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मानाची नाथवंशजांची काला दिंडी गावातील नाथ मंदिरातून काढण्यात आली. पालखी ओटामार्गे वाळवंटातून दिंडी नाथ मंदिरात नेण्यात आली. दरम्यान, कृष्ण दयार्णव महाराज यांची दिंडीही मंदिरात दाखल झाली. त्याच वेळी दक्षिण दरवाजातून ह.भ.प. अंमळनेरकर महाराज यांचीही दिंडी नाथ मंदिरात दाखल झाली. मंदिरात नाथवंशज पुष्कर महाराज गोसावी, योगीराज महाराज गोसावी, समस्त नाथवंशजांनी रिंगण करून भानुदास-एकनाथांच्या गजरात वारकरी व भाविकांसह पावल्या खेळल्या. यावेळी हजारो महिला भाविकांनी सजवलेल्या कलशातून दहीहंडीचा प्रसाद करून आणला होता. दहीहंडीचा प्रसाद फुटताच मंदिरात एकमेकांना काल्याचा प्रसाद वाटत होते.दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी आ. संदीपान भुमरे, खा. चंद्रकांत खैरे, नगराध्यक्ष सूरज लोळगे, दत्ता गोर्डे, माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार संजय वाघचौरे, काँग्रेसचे प्रदेश सचिव रवींद्र काळे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.छबिना पालखीवर पुष्पवृष्टीआलेल्या विविध दिंडी प्रमुखांनी आपापल्या फडावर काल्याचे कीर्तन करून पैठणनगरीचा निरोप घेतला. या वारकºयांना निरोप देताना आज पैठणकरांना भरून येत होते.गुरुवारी रात्री १२ वाजता गावातील नाथ मंदिरातून नाथ महाराजांच्या पादुकांची छबिना पालखी काढण्यात आली. या पालखीत मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले होते. ठिकठिकाणी या पालखीवर नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. ही पालखी गोदावरीच्या भेटीस नेण्यात आली व पुन्हा नाथ मंदिरात नेण्यात आली.शहर झाले सुने-सुनेवारकºयांचे तीन दिवसांपासून पैठणनगरीत असलेले वास्तव्य, संत-महंतांचे कीर्तन, भजन, दिंड्या, फड, राहुट्या, टाळ-मृदंग यासह भानुदास-एकनाथांच्या गजराने पैठणनगरी दुमदुमून गेली होती. अनेक वर्षांपासून सातत्याने येणाºया वारकºयांचे येथील नागरिकांशी आध्यात्मिक नाते गुंफले गेले आहे. यातून मोठा स्नेह निर्माण झालेला आहे. आज या वारकºयांचे पैठणनगरीतून प्रस्थान झाल्याने शहरातील हरिनामाचा गजर थंडावला. यामुळे येणारे दोन-तीन दिवस पैठणकरांना मोठे सुने-सुने वाटणार आहे.