शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
2
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
6
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
7
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
8
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
9
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
10
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
11
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
12
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
13
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
14
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
15
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
16
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
17
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
18
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारी कहाणी! अभिषेक बच्चनच्या I want to Talk चा भावुक ट्रेलर

फुलंब्रीत भाजपची ताकद आणखी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 1:20 AM

फुलंब्री नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसने राष्टवादी काँग्रेस व शिवसेनेला सोबत घेऊन ही निवडणूक लढविली खरी; पण निकाल विरोधात गेल्याने त्यांना जबर धक्का बसला. शहरात ‘कमळ’ चांगलेच फुलल्याने भाजपसाठी हा विजय उत्साह देणारा ठरला.

न.पं. निवडणूक विश्लेषण-रऊफ शेखफुलंब्री नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसने राष्टवादी काँग्रेस व शिवसेनेला सोबत घेऊन ही निवडणूक लढविली खरी; पण निकाल विरोधात गेल्याने त्यांना जबर धक्का बसला. शहरात ‘कमळ’ चांगलेच फुलल्याने भाजपसाठी हा विजय उत्साह देणारा ठरला.फुलंब्री नगर पंचायत स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. गेल्या तीन वर्षांपासून या निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्यांनी १० दिवस निवडणूक मैदान गाजवले. भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीने एकत्र येऊन शहर विकास आघाडी बनविली. गेल्या दहा दिवसांच्या प्रचारात सर्वच पक्षांच्या नेत्यांनी अनेक प्रचारसभा घेऊन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्याने शहरवासीयांना रणधुमाळी पाहावयास मिळाली.भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा. चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर, आ. अब्दुल सत्तार, माजी आ. डॉ. कल्याण काळे, आ. अतुल सावे, नारायण कुचे, इद्रीस मुलतानी, नामदेव पवार, सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर आदींनी प्रचारदौरे केले.हरिभाऊ बागडे यांना फायदाफुलंब्री तालुक्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या जि.प., पं.स. निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले होते.फुलंब्री शहरात मागील काळात भाजपला दोन ते अडीच हजारांपेक्षा जास्त मतदान मिळत नव्हते; पण या निवडणुकीत पाच हजार मतदान मिळाले, हे संकेत भाजपसाठी आनंददायीच ठरले.शहर विकास आघाडीच्या पॅनलचे आठ उमेदवार हे सर्वसामान्य असल्याने आघाडीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार केवळ १९० मतांनी पराभूत झाला. या निवडणुकीत जीएसटी, कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, सेंद्रिय बोंडअळी आदी विषयांवर विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल केला.त्यावेळी मतदारांनी टाळ्या वाजवून समर्थन केले असले तरी मतपेटीत भाजपच्या बाजूने कल दिला. या निवडणुकीत चार नगरसेवक थोड्या मतांनी विजयी झाले.एक उमेदवार तर केवळ चार मतांनी निवडून आला. या वॉर्डात सहा मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला. या मतदारांनी तसे न करता सरळ मतदान केले असते, तर चित्र बदलले असते. या निकालाने उमेदवार, कार्यकर्त्यांना मताची किंमत कळली आहे.मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचा भाजपला फायदाफुलंब्री शहरात १४ हजार मतदार आहेत; पण नगर पंचायत निवडणुकीत केवळ साडेदहा हजार मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी कमी झाली. आघाडीच्या वतीने मतदान करून घेण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. मतदानाची टक्केवारी वाढली असती, तर निकाल वेगळे लागले असते. कमी मतदानाचा फायदा भाजपला नक्कीच झाला, हे मात्र खरे.शिरसाठ यांना पहिला नगराध्यक्ष होण्याचा माननगर पंचायत स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक झाली. यात पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान सुहास शिरसाठ यांना मिळाला. राज्यात भाजपची सत्ता असल्याने आगामी काळात शहराचा विकास करण्याचे आव्हान आता त्यांच्यासमोर आहे.