उंडणगाव (औरंगाबाद ) : प्रणाली जाधव अमर रहे ,लिपिक नराधमाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, शालेय मुलींना सुरक्षित शिक्षण मिळावे. या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी व्हावी. तसेच या प्रकरणाचा तपास प्रसिद्ध विधितज्ञ उज्ज्वल निकम यांच्या कडे देण्यात यावा आदी मागण्यांसाठी येथे मुक मोर्चा काढण्यात आला होता. सदरील मागण्याचे निवेदन पोलीस व महसूल प्रशासनाला देण्यात आले. या मुक मोर्चात शालेय विद्यार्थी सह संपूर्ण गाव सहभागी झाले होते. तर शंभर टक्के गाव बंद ठेऊन सर्वच जण स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते.
उंडणगावमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थीनी प्रणाली कृष्णा जाधव हीने ५ फेब्रुवारी रोजी एका लिपिकाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेचा पडतास राज्यभर उमटत आहेत . येथे महा मोर्चाचे शनिवार रोजी सकाळी करण्यात आले होते. सकाळी ग्रामपंचायत कार्यालयापासून मुक मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात शालेय विद्यार्थी, विधार्थीनी, महिला, तरूण, तरूणी, गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
गावातील बाजारपेठ भागातील श्री. मारोती मंदिरासमोर शालेय विद्यार्थ्यांनी यांनी आपल्या भाषणातून विविध समस्या व मुलांपासून होणाऱ्या त्रास हे सांगितले. तसेच या शालेय विद्यार्थीनीच्या हस्ते अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण आहेर, नायब तहसीलदार सोनवणे, तलाठी कदम यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.