कदमांच्या ‘त्या’ अनुद्गाराचा तीव्र निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 12:39 AM2018-09-06T00:39:43+5:302018-09-06T00:40:36+5:30
भाजपचे आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या दिवशी महिलांच्या संदर्भात जे अनुद्गार काढले, त्याचा सर्वत्र निषेध होत असून, औरंगाबादेतही त्यांच्या या विधानाच्या निषेधार्थ संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : भाजपचे आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या दिवशी महिलांच्या संदर्भात जे अनुद्गार काढले, त्याचा सर्वत्र निषेध होत असून, औरंगाबादेतही त्यांच्या या विधानाच्या निषेधार्थ संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सरोज मसलगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या महिला शहागंजमधील गांधी भवनासमोर सकाळी जमू लागल्या. स्त्रियांच्या अत्याचाराला प्रोत्साहन देणाऱ्या राम कदम यांच्या वक्तव्याचा या महिलांनी चांगलाच समाचार घेतला. कदम यांच्या वक्तव्यामुळे स्त्रियांचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे.
भाजपचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, असा घणाघाती आरोप मसलगे पाटील यांनी यावेळी केला. त्या म्हणाल्या, स्त्री अत्याचाराच्या बाबतीत महाराष्टÑ हे अग्रक्रमाचे राज्य झाले आहे. कारण फडणवीस सरकारचे महिलांविरोधी धोरण, तसेच मनुवादी विचारसरणीचे भाजपचे नेते, मंत्री, वारंवार बेताल वक्तव्ये करीत आहेत व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांना पाठीशी घालत आहेत.
महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचीही भूमिका दरवेळी बोटचेपीच राहत आली आहे. त्यामुळे बेताल वक्तव्ये करणाºया नेत्यांना महिला आयोगाचा मुळीच धाक वाटत नाही, असेही मसलगे पाटील यांनी अधोरेखित केले.
या निदर्शनात जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा पानकडे, किरण कांबळे, रंजना जंजाळ, वैशाली तायडे, मंगल लोखंडे, शशिकला मगरे, मनीषा यादव, छाया मोडेकर, संजीवनी महापुरे, सुरेखा लोकरे, अनुसया दणके, शारदा ससाणे, सीता खंडागळे, नईमा शेख, रुकसाना शेख, समीना खान, हिराबाई जाधव, शकुंतला खरात, कौसर खान, गुलाबबाई गायकवाड आदींनी राम कदम यांच्या निषेधार्थ जोरदार नारेबाजी केली.
राष्टÑवादीचे जोडे मारो आंदोलन...
भाजपचे आमदार राम कदम यांची भाषा गुंडगिरीची वाटते, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत राष्टÑवादी युवक काँग्रेस व महिला काँग्रेसतर्फे क्रांतीचौकात राम कदम यांच्या प्रतिमेस साडी व बांगड्या घालून जोडे मारो आंदोलन केले.
यापुढे कुणीही महिलांबद्दल अपमानजनक उद्गार काढले तर त्यांना महाराष्टÑात फिरू देणार नसल्याचा इशारा राष्टÑवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता भांगे, जिल्हा महिला अध्यक्षा डॉ. अनुपमा पाथ्रीकर व राष्टÑवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशध्यक्षा सक्षना सलगर यांनी यावेळी दिला. राम कदम यांना थोडी जरी लाज असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही करण्यात आली.
शेख कय्युम अहमद, मेहराज पटेल, प्रतिभा वैद्य, अमोल दांडगे, दीपक बहिर, दिनेश नवगिरे, धनंजय मिसाळ, अमोल साळवे, जुबेरखान, अब्रार पटेल, सय्यद फय्याज, अमोल जाधव, शेख मेहबूब बाबा, अमोल ताठे, किरण गवई, मंजूषा पवार, शारदा चव्हाण, अनिसा खान, शकिला खान, सलमा बानो, शोभा गायकवाड, जेबुन्निसा, शमा परवेज, सरताज आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.
मराठा मावळा .........
मराठा मावळा संघटनेच्या महिला आघाडीतर्फे आ. राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आला. बजरंग चौकात झालेल्या निदर्शनात पूजा सोनवणे, वंदना वायकोस, प्रीती राजे भोसले, शिवगंगा हुंडीवाले, जयश्री फुके पाटील, वंदना साळुंके, सुवर्णा जाव, दीपाली गडवे, वर्षा पाटील, शीतल गांगुर्डे, पंढरीनाथ गोडसे पाटील, निवृत्ती मांडकीकर, बाळासाहेब भुमे, भरत कदम, सोमनाथ पवार, दीपक चिकटे, दीपक ढलमन, बाळू पठाडे, उदयराज गायकवाड, योगेश म्हस्के आदींनी या निदर्शनात सहभाग घेतला.
राम कदम यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा मराठा मावळा संघटनेच्या महिला त्यांच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात
आला.