औरंगाबाद : मोठ्या प्रतिक्षेनंतर मराठवाड्यात सर्वदूर पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासून दुपारी १२ पर्यंत दमदार पाऊस झाला. मराठवाड्यातील ६७ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच सर्व जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळ अतिवृष्टी खाली आले आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड घाटात दरड कोसळ्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यातील धरणात अपेक्षित पाणीसाठी नव्हता. यामुळे मराठवाड्यात मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती. आज पहाटेपासूनच विभागात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली. औरंगाबादसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्येही कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड जिल्ह्यात दमदार सरी कोसळल्या आहेत. यामुळे मराठवाड्यातील धरणातील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे.
कन्नड घाटात दरड कोसळली
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात सिंदफणा- गोदावरी नद्यांना पूर
पांचाळेश्वर, राक्षसभुवन,सुरळेगाव, म्हाळस पिंपळगावसह विविध गावातील गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. राजपुरकडे जाणा-या कापशी नदीला पूर आल्याने गावात जाणा-या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच अर्धामसला गावात जाणा-या रस्त्यांवरील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने गावात जाणारा रस्ता बंद झाला आहे. तसेच तालुक्यातून वाहणाऱ्या सिंदफना नदीलाही मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.
ग्राम पंचायत कार्यालयात पाणी शिरलेपरभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. तालुक्यातील हदगाव ( बु ) येथील गावशेजारील वस्ती तसेच ग्राम पंचायत कार्यालयात आज सकाळी पाणी शिरले.
निम्न मानार प्रकल्प १०० टक्के भरलानांदेड जिल्ह्यातील कंधारमधील निम्न मानार प्रकल्प १०० टक्के भरला आहे. प्रकल्पात पाणी येवा ५ .१५७ द.ल.घ.मी. सुरु आहे. त्यामुळे १७७ स्वंयचलीत दरवाजातून १ हजार ७४७ क्युसेस पाणी मानार नदीत विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
'त्या'पाच गावांचा संपर्क अजूनही तुटलेलाचपालम तालुक्यातील ग्रामीण भागात ३० आगस्ट रोजी दुपारी २ वाजता झालेल्या मुसळधार पावसाने लेंडी नदीला पूर येऊन सायंकाळी ४ वाजता ५ गावांचा संपर्क शहराशी तुटला होता. तब्बल १६ तास झाले तरीही पूर ओसरला नसल्याने या गावांचा संपर्क अजूनही तुटला असून ग्रामस्थ गावातच अडकून पडले आहेत.
धारूर तालूक्यातील सर्व धरणे भरली, शेतकरी सुखावला बीड जिल्ह्यातील धारूर तालूक्यातील सर्व धरणे भरली आहेत. घागरवडा आरणवाडी, कुंडलीका ही धरणे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने भरली असून नदी नाले ओसंडून वाहत आहेत. या पावसाचा पिकांना फायदाच होणार आसल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.