उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारी होत असून, यानिमित्त चारही मतमोजणी केंद्रावर तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ शिवाय उस्मानाबाद शहरासह भूम, तुळजापूर व उमरगा शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत़ प्रशासनाकडून त्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या असून, बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे़उस्मानाबाद-कळंब मतदार संघाची उस्मानाबाद शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयात, उमरगा मतदार संघाची मतमोजणी अंतुबळी पतंगे सभागृहात, तुळजापूर मतदार संघाची मोजनी श्री तुळजाभवानी महाविद्यालयाच्या स्पोर्ट रूममध्ये तर भूम-परंडा-वाशी मतदार संघाची मतमोजणी गोलेगाव रोडवरील नवबुध्दा स्टुडंन्ट या ठिकाणी होणार आहे़ या मतमोजणीच्या परिसरात राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची गर्दी राहणार आहे़ त्यामुळे या परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे़ शिवाय कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून चोख पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे़ सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांनी कायद्याचे उल्लंघन होवू नये याची दक्षता घ्यावी, चालकांनी बदललेल्या मार्गानुसार वाहने न्यावीत, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे़स्वतंत्र व्यवस्था४आयुर्वेदिक महाविद्यालयासमोरील मैदानाला लाकडी बांबूचे बॅरिगेटस् बांधून त्याच्या पलीकडे नागरिकांना बसण्यासाठी सोय केली आहे. तसेच स्पीकरद्वारेच होणाऱ्या अलाऊंसिंगनंतर त्यांना माहिती ऐकता येणार आहे.
विधानसभा मतमोजणीसाठी तगडा बंदोबस्त
By admin | Published: October 19, 2014 12:06 AM