शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

तांत्रिक अडचणीने विद्यार्थ्यांची ‘सत्त्व’ परीक्षा; त्रयस्थ यंत्रणेला विद्यापीठाने दिली तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 7:52 PM

पहिल्या दिवसापासूनच ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतींच्या परीक्षांचा गोंधळ उडाला.

ठळक मुद्देकोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहाणार नाही.

औरंगाबाद : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्र परीक्षेत उडालेला तांत्रिक गोंधळ थांबणार आहे की नाही. तुमच्यामुळे विद्यापीठाची जनसामान्यांमध्ये बदनामी होत आहे. यापुढे तांत्रिक अडचणीची कारणे ऐकून घेतली जाणार नाहीत, या शब्दांत परीक्षा घेणाऱ्या त्रयस्थ यंत्रणेला विद्यापीठ प्रशासनाने चांगलेच खडसावले. तरीही शुक्रवारी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला; पण त्याचे प्रमाण कमी होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ९ ऑक्टोबरपासून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांना सुरुवात झाली. पहिल्या दिवसापासूनच ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतींच्या परीक्षांचा गोंधळ उडाला. अनेक विद्यार्थ्यांना पेपरची लिंक ओपन झाली नाही. लिंक ओपन झाली, तर दुसऱ्याच विषयाचा पेपर स्क्रीनवर यायचा. सकाळच्या सत्रात ६० प्रश्न, तर दुपारच्या सत्रात ३० प्रश्न, अनेक प्रश्न तसेच पर्यायी उत्तरे चुकीची, कधी कधी रात्री उशिरापर्यंत ऑफलाईन पेपर डाऊनलोड होत नसत. या सर्व प्रकारांमुळे परीक्षार्थी हतबल झाले आहेत. 

दरम्यान, विद्यापीठाने पहिल्यांदाच ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन केले असून, ही परीक्षा त्रयस्थ यंत्रणेमार्फत घेतली जात आहे. विद्यापीठ प्रशासनाने या यंत्रणेला शुक्रवारी चांगलीच तंबी दिली असून, यापुढे कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या नाही पाहिजेत. गरज पडल्यास सर्व्हर हाताळण्यासाठी मनुष्यबळ वाढवा, अशा सूचनाही केल्या. त्यानुसार सदरील यंत्रणेने मनुष्यबळ वाढवून येणाऱ्या तांत्रिक अडचणीही सुधारण्याचा प्रयत्न केला. तरीही आज काही प्रमाणात लिंक उशिरा ओपन होणे, ऑफलाईन पेपर लवकर डाऊनलोड न होणे, अशा तक्रारी आल्या.

विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाहीयुवा सेनेचे उपसचिव तथा माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे, भारतीय विद्यार्थी सेनेचे डॉ. तुकाराम सराफ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ, तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रकाश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली संकेत कांबळे, रोहित जोगदंड, कपिल वानखेडे, राहुल कांबळे आदींनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेतली. परीक्षेतील गोंधळ थांबवाविद्यापीठाच्या चुकीमुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे, याची दखल घ्यावी लागेल; अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल, असा इशारा दिला. तेव्हा कुलगुरू डॉ. येवले म्हणाले की, कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहाणार नाही. एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ देणार नाही, याची मी खात्री देतो.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादexamपरीक्षा