औरंगाबाद : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून एका तरुणाला दोन जणांनी फायटरने मारहाण करून जखमी केले. एन-२ येथील संकेत मांगीलाल भाटे (२५) हा युवक ४ आॅगस्ट रोजी रात्री चौकातील गणेश मंडळासमोर बसलेला होता. त्यावेळी आरोपी सनी अराक (रा. जे सेक्टर, मुकुंदवाडी), बंटी (रा. संजयनगर) हे दोघे तेथे आले. त्यांनी संकेतकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. मी का पैसे देऊ, असे म्हणत त्याने नकार दिला. तेव्हा आरोपींनी शिवीगाळ करीत संकेतला फायटरने मारहाण केली.
दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मारहाण
By admin | Published: September 07, 2014 12:32 AM