औरंगाबाद जिल्ह्यात २६० बस सेवेच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या असून, प्रवासी संख्या लक्षात घेता, त्यांच्या नियमानुसार एसटी महामंडळाने स्पर्धा करीत वीस रातराणी सुरू केल्या आहेत. प्रमुख मार्गांवर खासगी आराम बसच्या तुलनेत त्याही स्पर्धा करीत आहेत. खासगी बसचे भाडे जास्त असले तरी, प्रवासी मात्र त्याच बसेसने प्रवास करणे अधिक पसंत करीत आहेत. जिल्ह्यात १२१३ चालक असून, ९३१ वाहक आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असून आंतरजिल्हा शेतकऱ्यांची व प्रवाशांची गर्दी जाणवत आहे. उद्योग-व्यवसाय सुरू झाल्यामुळे कामगार गावाहून कामाच्या ठिकाणी येत आहेत. कोरोना महामारीमुळे मुला-बाळांसह गावाला गेलेल्या नागरिकांचे लोंढे पुन्हा शहराच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे हक्काच्या समजल्या जाणाऱ्या एसटी बसला प्रवासी गर्दी करीत आहेत. त्या दुप्पट खासगी आरामदायी बसेस खचाखच भरून जाताना दिसत आहेत.
मुंबईकडे जाणाऱ्या बसेसना अधिक गर्दी....
शहरातून मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या बसेसना अधिक गर्दी होताना दिसत आहे. एसटी महामंडळाच्या बसेसचे तिकीट दर कमी असले तरी, खासगी आरामदायी बस सेवा सुसाट प्रवास करताना दिसत आहे. ट्रॅव्हल्सच्या कार्यालयांवर दररोज ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रेल्वेचे तिकीट नाही मिळाले, तर खासगी बसने जाण्याकडे प्रवासी लक्ष केंद्रित करीत असतो.
प्रत्येक मार्गांवर बस सेवेला प्रतिसाद.....
कोरोनामुळे प्रवासी नाईलाजास्तव घरातच बसून होते. अनलाॅकनंतर ट्रॅव्हल्सला गर्दी दिसून येत असून आठवड्यानंतर मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत प्रवाशांना परवानगी दिली जाते. नागपूर आणि मुंबई या दोन मार्गावर प्रवासी संख्या अधिक असून, आंतरजिल्हा विविध तालुक्यात प्रवासी संख्या बऱ्यापैकी आहे.
अनलॉकनंतर २६० बसेसच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. प्रवाशांनी खबरदारी घ्यावी, सुरक्षित प्रवास करावा यासाठी प्रयत्न केला जात आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर अनिवार्य करावा. लांब पल्ल्याच्या बसेस सुरू करण्यात आल्या असून प्रवाशांच्या प्रतिसादानुसार रातराणी बससेवाही सुरू केलेली आहे.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक
जिल्ह्यात किती बसेसच्या फेऱ्या.....
२६०
रातराणी बसेस किती सुरू...
२०
चालक संख्या...
१२१३
वाहक संख्या..
९३१
__--------------------
(डमी स्टार ८०८)