लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज भाववाढ होत आहे. त्यामुळे एस. टी. महामंडळावर ४७० कोटी रुपयांचा भार पडत आहे. दुसरीकडे कामगार करारापोटी पैसे देण्याचा भाग असून, २ हजार ३०० कोटींवर एकत्रित तोटा आहे. त्यामुळे ‘एस.टी.’ ची भाडेवाढ केल्याशिवाय मार्ग नाही. यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.एस. टी. महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालय परिसरात कर्मचाऱ्यांनी साकारलेल्या उद्यानाचे शनिवारी (दि.२६) दिवाकर रावते यांच्या हस्ते उद््घाटन झाले. याप्रसंगी महापौर नंदकुमार घोडेले, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी, विभागीय वाहतूक अधिकारी अमोल अहिरे, विकास जैन, अंबादास दानवे आदी उपस्थित होते.यावेळी पत्रकारांशी बोलताना रावते म्हणाले, गेल्या काही दिवसांत डिझेल दरवाढीने एस. टी. महामंडळावर ४७० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ११ रुपयांनी डिझेलच्या दरात वाढ झाली. डिझेल दरवाढ आणि एस. टी. चे सध्याचे तिकिटांचे दर याचा हिशोब कसा करायचा, हा प्रश्न आहे. दररोज इंधनाच्या दरात वाढ होत असल्याने भाडेवाढ केल्याशिवाय एस.टी.ला पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. सध्याच्या परिस्थितीत एस. टी. टिकली पाहिजे, पुढे गेली पाहिजे ही भूमिका आहे. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक परदेश दौºयावर आहेत. ते आल्यानंतर जूनमध्ये तिकीट दरवाढ करण्याच्या दृष्टीने शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
एसटीची भाडेवाढ अढळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:43 AM
पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज भाववाढ होत आहे. त्यामुळे एस. टी. महामंडळावर ४७० कोटी रुपयांचा भार पडत आहे. दुसरीकडे कामगार करारापोटी पैसे देण्याचा भाग असून, २ हजार ३०० कोटींवर एकत्रित तोटा आहे. त्यामुळे ‘एस.टी.’ ची भाडेवाढ केल्याशिवाय मार्ग नाही. यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
ठळक मुद्देरावते : इंधन दरवाढीने ४७० कोटींचा भार