शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

घाटीतील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या माथी फर्निचरशिवाय वसतिगृह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 6:31 PM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) फर्निचरशिवाय वसतिगृह पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी निवासी डॉक्टरांकडून लेखी हमीपत्र घेण्यात येत आहे.

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) फर्निचरशिवाय वसतिगृह पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी निवासी डॉक्टरांकडून लेखी हमीपत्र घेण्यात येत आहे.

घाटी रुग्णालयात नव्याने बांधण्यात आलेले पदव्युत्तर विद्यार्थी वसतिगृह गेल्या वर्षभरापासून फर्निचरअभावी धूळखात आहे. फर्निचरसाठी आधी निधीची प्रतीक्षा करावी लागली. निधी उपलब्ध झाल्यानंतरही फर्निचर दाखल होत नसल्याची स्थिती आहे, त्यामुळे पदव्युत्तर शिक्षणासाठी आलेल्या डॉक्टरांच्या निवासाची सोय क रण्याचा प्रश्न घाटी प्रशासनासमोर उभा आहे.

निवासव्यवस्था कमी आणि प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक, अशी अवस्था आहे. त्यामुळे डॉक्टरांवर मेडिसिन विभागासमोर बांधण्यात आलेल्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या नव्या वसतिगृहात फर्निचरशिवाय राहण्याची वेळ ओढावली आहे.  पदव्युत्तरच्या जागा वाढल्याने घाटीत नवीन वसतिगृह बांधण्यात आले. त्यात प्रत्येकी ४८ खोल्यांचे चार स्वतंत्र भाग आहेत. एका खोलीत प्रत्येकी दोन डॉक्टरांची व्यवस्था करण्याची सुविधा आहे.

याविषयी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या, फर्निचरशिवाय वसतिगृहात राहण्यास विद्यार्थी तयार आहेत. कोणतीही तक्रार नसल्याबाबत ते बॉण्डपेपरवर लिहून देत आहेत. लवकरच फर्निचर प्राप्त होईल. 

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीHealthआरोग्यdoctorडॉक्टर