शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

हसून हसून दमाल! चक्क उत्तरपत्रिका घेऊनच ‘तो’ पळाला; बारावी गणिताच्या परीक्षेवेळी झाला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2023 7:08 AM

शुक्रवारी बारावीचा गणिताचा पेपर होता.  उस्मानपुरा परिसरातील नागसेन उच्च माध्यमिक विद्यालयात १७ क्रमांकाच्या कक्षात पर्यवेक्षकांनी २८ पानांची शिवलेल्या उत्तरपत्रिका सर्व विद्यार्थ्यांना वाटल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर : उस्मानपुरा भागात नागसेन उच्च माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी एका परीक्षार्थी विद्यार्थ्याने गणिताचा पेपर अवघड चालल्यामुळे चक्क उत्तपत्रिका घेऊनच परीक्षा कक्षातून धूम ठोकली. या घटनेमुळे हवालदिल झालेल्या पर्यवेक्षकाने केंद्र संचालकांमार्फत पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर त्याचा शोध घेऊन त्या विद्यार्थ्याला एका खासगी अभ्यासिकेतून पकडून आणले.

शुक्रवारी बारावीचा गणिताचा पेपर होता.  उस्मानपुरा परिसरातील नागसेन उच्च माध्यमिक विद्यालयात १७ क्रमांकाच्या कक्षात पर्यवेक्षकांनी २८ पानांची शिवलेल्या उत्तरपत्रिका सर्व विद्यार्थ्यांना वाटल्या. त्यानंतर या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेची शिलाई उसवली व त्यातील १३, १४, १५ आणि १६ या क्रमांकाची पाने व प्रश्नपत्रिका बेंचवर ठेवून तो लघुशंकेसाठी म्हणून बाहेर गेला. त्याने शाळेच्या संरक्षक भिंतीवरून उडी घेऊन परीक्षा केंद्रातून पळ काढला.

असे आले लक्षातपरीक्षार्थी परत न आल्याने हा प्रकार समोर आला. पोलिसांना पाचारण करण्यात आले. बरीच शोधाशोध केल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. मात्र, आपण उत्तरपत्रिका नेलेलीच नाही, यावर तो ठाम राहिला. शेवटी त्याचे वडील केंद्रात आले. तेव्हा मात्र त्याने वडिलांना सोबत नेलेली उत्तरपत्रिका कुठे ठेवली, ते सांगितले.

पेपर सुरू हाेण्यापूर्वीच झाला व्हायरलबुलडाणा :  बारावीचा गणिताचा पेपर ३ मार्च राेजी सकाळी १०:३० वाजताच समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. हा पेपर सिंदखेडराजा तालुक्यातील एका केंद्रावरून समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. याविषयी पाेलिसात तक्रार दाखल केली असून  काेणत्या केंद्रावरून व किती वाजता हा पेपर व्हायरल झाला, याचा शाेध सुरू आहे. 

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षा