शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

एकाच वेळी विद्यार्थ्यांना घेता येणार दोन पदव्या

By राम शिनगारे | Published: July 06, 2023 8:12 PM

एमजीएम विद्यापीठाच्या कुलगुरूंची माहिती : नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी

छत्रपती संभाजीनगर : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे एमजीएम विद्यापीठात लागू करण्यात आले आहे. या धोरणानुसार एकाच वेळी विद्यार्थ्यांना दोन पदव्या घेता येणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले क्रेडिटस् विद्यार्थ्यांना पूर्ण करावे लागणार असल्याची माहिती एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एमजीएम विद्यापीठाने नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी प्रशासकीय इमारतीमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी कुलगुरू डॉ. सपकाळ यांच्यासह कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, आधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, डॉ. हरिरंग शिंदे, प्रा. तन्वीर अहमद, उपकुलसचिव परमिंदर कौर यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. सपकाळ म्हणाले, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नागरिकांना ग्लोबल सिटीझन बनविण्याच्या उद्देशाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होत आहे. या बदलांना एमजीएम विद्यापीठ प्रभावीपणे सामोरे गेले असून, अंमलबजावणीस सुरुवात झाल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यापीठातील सात विद्याशाखा असून, एकदा विद्यार्थ्याने विद्यापीठात प्रवेश केल्यानंतर त्याला कोणत्याही विद्याशाखेत शिक्षण पूर्ण करता येणार आहे. या शाखांमधील मेजर आणि मायनर विषय निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांस असणार आहे. त्यानुसार एकाच वेळी दोन पदव्याही विद्यार्थ्या घेता येऊ शकतात असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही वर्षी पडा बाहेरनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पाच वर्षांचा अभ्यासक्रम असणार आहे. पहिल्या वर्षी प्रमाणपत्र, दुसऱ्या वर्षी पदविका, तीन वर्षांनी पदवी आणि चार वर्षांची बॅचलर्स पदवी आणि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यास मिळणार आहे. यातील कोणत्याही वर्षी विद्यार्थ्याना आगमन आणि निर्गमन करता येणार असल्याचेही कुलगुरूं डॉ. सपकाळ यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबादmgm campusएमजीएम परिसर