छत्रपती संभाजीनगर : अनेकदा लहान मुले बसल्या जागी झोपी जातात. तर शाळेतही अनेकदा मुलांना डुलकी लागते. असे वारंवार होत असेल तर मुलांची पुरेशी झोप होत नसल्याचे कारण असू शकते. त्यातूनच त्यांच्या शिक्षणासह दैनंदिन कार्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुलांची पुरेशी झोप होते की नाही याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
कोणाला किती तास झोप हवी?जन्मानंतर चार महिन्यांपर्यंत : किमान १२ ते १४ तास.४ ते १२ महिने : साधारणपणे १२ तास.एक ते दोन वर्षे : जवळपास १० ते १२ तास झोप आवश्यक.तीन ते १२ वर्षे : साधारणपणे ९ ते १० तास.१३ ते १८ वर्षे : सामान्यपणे ९ ते १० तास झोप आवश्यक.
कमी झोपेचे धोकेकमी झोपेमुळे चिडचिडेपणा, लक्ष केंद्रित न होणे, स्मृतिदोष आदी समस्या उद्भवू शकतात. कमी झोपेमुळे मुलांच्या वाढीवरही परिणाम होतो. त्याबरोबर इतर आजारांचाही धोका वाढतो.
अधिक झोपेचे धोकेअधिक झोप घेणेही आरोग्यासाठी नुकसानदायक आहे. अधिक झोपेमुळे वजन वाढते. त्यातून इतर आजारांना आमंत्रण मिळते. अधिक झोपेचा त्रास असेल तर हायपोथायराॅइड असू शकते.
लवकर झोपणे फायदेशीरलहान मुलांनी साधारण रात्री ८ ते ९ वाजेदरम्यान झोपले पाहिजे. मोठ्या व्यक्तींनी रात्री १० ते ११ वाजेदरम्यान झोपणे फायदेशीर ठरते. रात्री झोपताना मोबाइल वापरू नये. झोप चांगली झाली तर मानसिक आरोग्यही चांगले राहते. ताणतणाव दूर होण्यास मदत होते.- डाॅ. फैसल खिलजी, मनोविकारतज्ज्ञ