औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बी एसस्सी पॅरामेडिकल अभ्यासक्रमाच्या १२५ जागांसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ऑनलाईन प्रवेश नोंदणीसाठी ८ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, १३ ऑक्टोबरला संस्थेच्या संकेतस्थळावर तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
पहिली तात्पुरती निवड यादी घाटीच्या संकेतस्थळावर १४ ऑक्टोबरला जाहीर होणार असून, पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चितीसाठी २० ऑक्टोबरपर्यंत मुदत असेल. २१ ऑक्टोबरला दुसऱ्या फेरीसाठी निवड यादी ऑनलाइन जाहीर होईल. दुसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चितीची २१ ऑक्टोबरपर्यंत मुदत असेल. शुक्रवारी दुपारपर्यंत चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.
अशा आहेत जागा२०२२-२३ शैक्षणिक वर्षासाठी ११ विषयांच्या १२५ जागा आहेत. त्या पुढीलप्रमाणे; लॅबोरेटरी ४०, रेडिओग्राफी १५, रेडिओथेरपी ५, कार्डिओलाॅजी ५, न्यूरोलाॅजी ५, ब्लड ट्रान्स्फ्युजन ५, ऑप्टोमेट्री ५, ऑपरेशन थिएटर ३०, एन्डोस्कोपी ५, कम्युनिटी मेडिसीन ५, इमर्जन्सी मेडिसीन ५.
वेबसाईट : http://www.gmcaurangabad.com/