औरंगाबाद : स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या बेरोजगार युवाकांनी विराट मोर्चा काढल्यानंतर पोलीस भरतीची तयारी करणार्या युवकांनीही मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना दिले. या मोर्चाचे आयोजन पोलीस भरती विद्यार्थी कृती समिती आणि पोलीस फॅमिली वेलफेअर असोशिएशनतर्फे केले होते.
पोलीस भरतीची तयारी करणार्या युवकांनी क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालय असा मोर्चा आज सकाळी काढला. या सुरूवातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर मोर्चाला सुरूवात झाली. क्रांतीचौक, पैठणगेट, गुलमंडी, सिटी चौक, शहागंज मार्गे विभागीय आयुक्तालय असा मोर्चा काढण्यात आला. यात पोलीस भरतीची तयारी करणारे शेकडो युवकांनी उत्सर्फुतपणे सहभाग नोंदवला. शेवटी विभागीय आयुक्तांना मागण्याचे निवेदन देऊन मोर्चाचा समारोप झाला. या निवेदनावर पोलीस फॅमिली वेलफेअर असोशिएशनचे दिपक गोफणे, पोलीस भरती विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष विनायक भानुसे पाटील, उपाध्यक्ष सिद्धार्थ भालेराव, सचिव मोहम्मद हुसेन शेख आदींच्या स्वाक्षर्या आहेत. मोर्चे करण्याच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या २६ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे संंघटनेचे अध्यक्ष विनायक भानुसे पाटील यांनी सांगितले.
या आहेत प्रमुख मागण्या- महाराष्ट्रात २०१८ मध्ये एकुण ३० हजार पोलीसांची भरती करावी. कारण २०१४,१५,१६,१७ मध्ये अनुक्रमे ८,७,७ व ६ हजार ५०० एवढ्याचा जागा भरती केली. - खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा २८ वरून ३० करण्यात यावे. - राज्यात पोलीस भरतीची एकदाच लेखी परीक्षा घ्यावी, कारण एक मुलगा अनेक जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रियेत परीक्षा देतो व ऐका पेक्षा अधिक ठिकाणी पात्रही होतो. मात्र रूजू कोणत्याही एकाच जिल्ह्यात होतो. इतर पात्र ठिकाणची त्याची जागा रिक्त राहते.- पोलीस भरतीसाठीच्या लेखी परीक्षेचा पॅर्टन आणि काठिण्यपातळी एकसारखी असावी.- पोलीस भरती प्रक्रिया जाहीर झाल्यापासून प्रत्यक्ष पोलीस भरतीची मैदानी चाचणीची प्रक्रिया सुरू करण्याचा कालावधी ३ महिने असावा.- भरतीत डमी उमेदवार टाळण्यासाठी सर्वच ठिकाणी बायोमॅट्रीक पद्धतीचा वापर करावा.-भरती प्रक्रिया राबवत असताना एका दिवशी ५०० विद्यार्थ्यांचीच मैदानी चाचणी घेण्यात यावी.- पोलीस पाल्यांना देण्यात येणार्या आरक्षणात वाढ करून १० टक्के करावे.- पोलीस कुटुंब आरोग्य योजना पोलीस कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर देखील देण्यात यावी.-पोलीस कर्मचार्यांना ८ तासांचीच ड्युटी असावी.