- आकाश महेर (विद्यार्थी, इयत्ता १२ वी)
स्पर्धा ही गुणवत्ता दाखविते
कोविडमुळे मुलांना मैदानी खेळात सहभाग घेता आला नाही, स्थानिक पातळीवर मोठ्या स्पर्धा भरविण्यात आल्या नसल्याने खेळाचा उत्साह कमी होतो. शैक्षणिक स्तरावरच खेळामुळे अधिकचे गुण मिळून गुणवत्ता वाढल्याने त्याचा विद्यार्थ्यांना फायदाच होतो.
- नम्रता धोंगडे (विद्यार्थिनी, इयत्ता १२ वी)
पूर्वीसारखेच गुण मिळणार...
शासनाने कोणत्याही स्पर्धा घेतल्या नसल्याने यंदा होणाऱ्या परीक्षेत विद्यार्थ्यांना पूर्वीसारखेच गुण मिळणार आहेत. खेळाडूंना मिळणाऱ्या गुणांचा त्यात शक्यतो समावेश नसणार. याविषयी शासनाचा अद्याप काही निर्णय झालेला नाही. परिपत्रकदेखील आलेले नाही.
- उदय डोंगरे (क्रीडा विभागप्रमुख)
खेळाचे विविध गुण...
खेळाच्या प्रकारातील १० व १५, आणि २५ असे गुण ठरलेले आहेत. स्थानिक व राज्य आंतरराज्य स्पर्धाच्या गुणाचा त्यात समावेश आहे. कोविडमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. खेळच नाही तर गुण कसे मिळणार.
- प्रा.मकरंद जोशी ( प्रशिक्षक, अंतरराष्ट्रीय पंच)