शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
2
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
3
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
4
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
5
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
6
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
7
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
8
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
9
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
10
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
11
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
12
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
14
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
15
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
16
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
17
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
18
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
20
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले

बोलक्या फरशीवर विद्यार्थी रमले अभ्यासात

By admin | Published: March 20, 2016 11:41 PM

विठ्ठल फुलारी, भोकर ज्ञानरचनावादाचा व्यवस्थित उपयोग करून घेत शाळेतील फरशी बोलकी झाली़ अनेक रंगबेरंगी शैक्षणिक साहित्य तयार झाले़

विठ्ठल फुलारी, भोकर ज्ञानरचनावादाचा व्यवस्थित उपयोग करून घेत शाळेतील फरशी बोलकी झाली़ अनेक रंगबेरंगी शैक्षणिक साहित्य तयार झाले़ स्वत:च्या खर्चातून शाळेला नवे रूप आणण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून मुख्याध्यापक व शिक्षिकांनी परिश्रम घेतले़ आता याचे फळ मिळायला सुरुवात झाली़ विद्यार्थी अभ्यासात रममान होवू लागले़ ही किमया साधली भोकर येथील समतानगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेनेभौतिक सुविधांपासून काही प्रमाणात वंचित असलेली ही शाळा़ शाळेला संरक्षक भिंत नाही़ वर्ग चार असले तरी वर्गखोल्या मात्र तीनच़ विद्यार्थीही गरीब कुटुंबातून आलेले़ यामुळे लोकवाटा मात्र शून्य़ यात ाअणखी अडचण म्हणजे ७५ टक्के विद्यार्थी द्विभाषिक़ कोणी बंजारा तर कोणी तेलगु, हिंदी बोलणाऱ यामुळे शिकवताना अनंत अडचणी निर्माण होत होत्या़ पण आता या शाळेतील मुख्याध्यापक डी़डी़छत्रे, सहशिक्षिका एस़एऩ बुडकेवार, ए़एच़जमदाडे, प्रीती नांदेडे यांनी ज्ञानरचनावादप्रमाणे शाळेला वेगळे रूप दिले़ स्वखर्चातून शिक्षकांनी शाळेच्या फरशीवर अभ्यासक्रम उतरविला़ अनेक रंगाचा उपयोग करून फरशीवरचे रेखाटन अप्रतिम केले़ स्वरांच्या बाराखडीचे फूल, रंगीत खडे, मनी, अंक जिना, बाराखडीचे झाड, अंकांची व अक्षराची अळी, अक्षरपाटी, संख्येचा लहान-मोठेपणा, फरशीवरील स्वत:ची ओळख, रिंग मास्टर, संख्यांचा आकाशकंदिल, संख्यांची आगगाडी, अंकशिडीचा खेळ अशा अनेक सुंदर शैक्षणिक साहित्याची निर्मिती करून विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची गोडी लावली़ यामुळे द्विभाषिक असलेले विद्यार्थी आता अभ्यासात रमू लागले आहेत़ जोडशब्दापासून वाचनापर्यंत आणि गणितीक्रियामध्येही मुले प्रगती करीत आहेत़ कोणतीही बाह्य शिकवणी नसलेले हे चिमुकले आता अभ्यासात मग्न झाले आहेत़ गुणवत्ता वाढत आहे़ विद्यार्थी प्रगत होत आहेत़ विशेष म्हणजे, द्विभाषिक विद्यार्थ्यांना सहज मराठी समजावे यासाठी सांकेतिक भाषेचा वापर सुरू करण्यात आला़ सध्या सांकेतिक भाषेमध्ये हे विद्यार्थी नुसते शब्द नव्हे, तर वाक्य सांगतात़ या सांकेतिक भाषेने विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासाबाबत अधिक आवड निर्माण झाली़ अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतील वातावरणात ज्ञानरचनावादामुळे विद्यार्थ्यांची प्रगती साधण्याचा या शाळेने यशस्वी प्रयत्न सुरू केला आहे़