शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

स्टंटबाजी दारुड्याच्या अंगलट; नदीच्या पुरात वाहून जाताना दोघांनी साहसाने वाचवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 7:44 PM

तरुणाला पुराच्या पाण्यात आंघोळ करण्याचा मोह झाला आणि त्याने  कोणाचेही न ऐकता सरळ पाण्यात उडी घेतली.

ठळक मुद्दे दोन तरुणांनी जीव धोक्यात घालून वाचविले प्राणदाखविलेल्या साहसाबद्दल तरुणांचे सर्वत्र कौतुक 

सिल्लोड/अंधारी : सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील एका तरुणाने आंघोळ करण्यासाठी स्टंट करून भोरडी नदीच्या पुरात उडी घेतली. ही स्टंटबाजी त्याच्या चांगलीच अंगलट येऊन तो वाहून जाऊ लागला. यावेळी गावातील दोन तरुणांनी पुराच्या पाण्यात उडी घेऊन बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला. समाधान माधवराव वानखेडे (२२), असे तरुणाचे नाव आहे. 

सिल्लोड तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. तालुक्यातील सर्व नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. अंधारी येथील भोरडी नदीही पुरामुळे दुथडीभरून वाहत आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजेदरम्यान समाधान वानखेडे या तरुणाला पुराच्या पाण्यात आंघोळ करण्याचा मोह झाला आणि त्याने  कोणाचेही न ऐकता सरळ पाण्यात उडी घेतली. काही वेळ तो पोहला. मात्र, पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. ही बाब त्याचा स्टंट पाहणाऱ्या नदीकाठावरील लोकांच्या लक्षात आली. 

यावेळी गावातीलच अक्षय विध्वंस (२५, सर्पमित्र) व नवनाथ तायडे (२५) या तरुणांनी क्षणाचाही विचार न करता, एका वाहनावरील दोरखंड ओढले व बाकी लोकांच्या मदतीने त्यांनी दोरी पाण्यात सोडून पुराच्या पाण्यात उड्या घेतल्या. स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांनी त्याला पाण्याबाहेर काढले. त्याच्या पोटावर दाब देऊन पाणी बाहेर काढल्यानंतर त्याचा जीव वाचला. अक्षय विध्वंस व नवनाथ तायडे या तरुणांनी दाखविलेल्या साहसाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनेचा व्हिडिओ गावातील काही तरुणांनी सोशल मीडियावर टाकला. काळजाचा ठोका चुकविणाऱ्या काही मिनिटांच्या या थराराची तालुक्यात रविवारी सगळीकडे चर्चा होती.  

ग्रामस्थांनी सांगितले, तो दारूच्या नशेत होतापुरामुळे नदीचे रौद्ररूप पाहण्यासाठी गावातील अनेक जण नदीकाठी उपस्थित होते. अशा वेळी समाधान नदीत उडी घेत असताना अनेकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र,  त्याने कोणाचेही ऐकले नाही. यावेळी तो दारूच्या नशेत होता आणि नशेतच त्याने पुरात उडी घेतल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. पुराच्या खळाळल्या पाण्यात उडी घेतल्यानंतर तो ज्यावेळी गटांगळ्या खाऊन वाहून जाऊ लागला, तेव्हा सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. यात दोन तरुणांनी साहस दाखविल्याने त्याचा जीव वाचला. 

सिल्लोड पोलिसांनी केला तरुणांचा सत्कार दोन्ही तरुणांच्या धाडसाचे कौतुक करून उपविभागीय अधिकारी सुदर्शन  मुंडे , सहायक पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी अक्षय विध्वंस, नवनाथ तायडे यांचा सत्कार केला. यावेळी फौजदार  विकास आडे, कर्मचारी  विष्णू पल्हाळ  अंधारी येथील पोलीस पाटील, शिक्षक तायडे हे हजर होते.

टॅग्स :floodपूरAurangabadऔरंगाबादriverनदी