शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर गायब, कर्मचाऱ्यांकडून उपचार

By admin | Published: May 12, 2017 11:44 PM

परंडा : डॉक्टरांची गैरहजेरी असल्याने विविध आजारांमुळे विव्हळत असलेल्या रुग्णांवर कर्मचाऱ्यांनीच औषधोपचार केल्याचा प्रकार गुरूवारी रात्री येथील उपजिल्हा रुग्णालयात पहावयास मिळाला़

विजय माने। लोकमत न्यूज नेटवर्कपरंडा : डॉक्टरांची गैरहजेरी असल्याने विविध आजारांमुळे विव्हळत असलेल्या रुग्णांवर कर्मचाऱ्यांनीच औषधोपचार केल्याचा प्रकार गुरूवारी रात्री येथील उपजिल्हा रुग्णालयात पहावयास मिळाला़ ईसीजी, एक्स-रे, ब्लडबँक आदी असुविधांमुळे रुग्णांसह नातेवाईकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे़ विशेषत: अल्ट्रा सोनोग्राफी विभागाचे तर स्टोअररूममध्ये रूपांतर झाल्याचे दिसून आले़शहरासह तालुक्यातील ९६ गावातील नागरिकांना येथील उपजिल्हा रुग्णालयातून आरोग्य सेवा मिळते़ बुधवारी रात्री ९ वाजता उपजिल्हा रुग्णालयात ‘आॅन डयूटी’ असलेल्या डॉ़ निलोफर पठाण रुग्णालयात आढळून आल्या नाहीत़ त्यावेळी उपजिल्हा रुग्णालयाची जवाबदारी परिचारिका उल्का कोल्हे, शत्रक्रिया परिचारीका एस़एस़ जाधव यांच्या खांद्यावर दिसून आली. त्यावेळी पिठापुरी येथील खरात दाम्पत्य आपल्या १४ वर्षाच्या मुलाला घेऊन रुग्णालयात आले. गणेश खरात यांच्या पाठीला कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले होते. रुग्णालयात आले तेव्हा गणेश खूप भयभित अवस्थेत होता. डॉक्टर नसल्याने परिचारिका कोल्हे व शस्त्रक्रिया विभागाच्या परिचारीका जाधव यांनीच गणेशवर उपचार केले. डॉक्टर गैरहजर असल्याने सतिष खरात यांचा पारा सातव्या आसमानावर गेल्याचा पहावयास मिळाला. रात्री १०़०५ वाजता अंतर्गत विभागाच्या मुख्यद्वारावर एकाच दुचाकीवर भोत्रा गावाहून चौघे आले़ ११ वर्षीय साक्षी जाधवला विंचू चावल्याने तिला वेदना असाहय होत होत्या़ साक्षी जाधवचे वडील, पत्नी, मुलगा साक्षीला घेऊन दुचाकीवरुन आले होते. रुग्णालयात साक्षीला फरशीवर खाली बसवून उपचार करण्यात आले. हे उपचार देखील परिचारीकेच्या हातूनच करण्यात आले़ जवळपास अर्धा तास गायब असलेल्या डॉ़ निलोफर पठाण ह्या ९़२१ वाजता आल्या आणि काही वेळ थांबून १०़१४ वाजता निघून गेल्या़ त्या रात्री १२़३० पर्यंत परतल्या नव्हत्या़ यादरम्यान रुग्णालयातील अंतर्गत व बाहय परिसराचा आढावा घेतला असता ‘अल्ट्रा सोनोग्राफी’ विभागाला स्टोअररुम बनवण्यात आल्याचे दिसून आले. ही अल्ट्रा सोनाग्राफी अनेक वर्षापासून बंद पडली आहे़ अंतरुग्ण विभागातील नातेवाईक मिळेल त्या जागेत झोपले होते. रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची मुबलक सुविधा नाही़ बंद पडलेल्या फिल्टरव्दारे गरम पाणी रुग्णासह नातेवाईकांना प्यावे लागते. रुग्णालयातील कामाचे वेळापत्रक दर्शवणाऱ्या फलकावरही १५ मार्च रोजी आॅनडयूटी असलेल्या कर्मचाऱ्यांची नावे होती़ डॉक्टरचा कॉलम मात्र होता. ब्लड बँकेच्या शेजारील रूमचे बांधकाम सुरू असल्याने हा विभागही बंद आहे़ गरजेनुसार रक्तबॅग मागविण्यात येतात.