लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : व्हिजन डाक्युमेंट अंतर्गत अधिकाºयांनी सादर केलेल्या आराखड्यांवर चर्चा करून जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी बहुतांश अधिकाºयांना सुधारित व परिपूर्ण आराखडे सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत़केंद्र शासनाच्या न्यू इंडिया मंथन या उपक्रमांंतर्गत २०२२ पर्यंतच्या विकास कामांचे नियोजन करण्यासाठी व्हिजन डाक्युमेंट आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी विविध विभागांच्या अधिकाºयांना दिल्या होत्या़ १० ते १५ उद्दिष्ट निश्चित करून आराखडे सादर करण्याचे सूचित केले होते़जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार विभागांनी आराखडे तयार करून ते सादर केले होते़ २४ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात बैठक घेण्यात आली़ विभागनिहाय आराखड्यांवर चर्चा झाली़ त्यानंतर अधिकाºयांनी सुधारित व परिपूर्ण आराखडे तयार करून ते सादर करावेत, अशा सूचना अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत़ या बैठकीस कृषी, आरोग्य, उद्योग, कौशल्य विकास, शिक्षण, प्रशिक्षण, तंत्रशिक्षण, रोजगार-स्वयंरोजगार, पाणीपुरवठा, ग्रामविकास आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली़ यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, सहाय्यक नियोजन अधिकारी ज्योती बगाटे आदींची उपस्थिती होती़
सुधारित आराखडे सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:26 AM