खुलताबाद : तालुक्यातील सोनखेडा येथे बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे झालेले बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामाची चौकशी करा, अशी मागणी करीत सोनखेडा येथील सरपंच, उपसरंपच व सदस्यांनी आरोग्य उपकेंद्राच्या छतावर ठाण मांडून शोलेस्टाईल आंदोलन सुरू केले आहे.
खुलताबाद तालुक्यातील सोनखेडा येथे सन २००८ मध्ये २० लाख रुपये खर्चून आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधलेली आहे. हे बांधकाम पाडून त्याठिकाणी नवीन इमारत बांधावी तसेच निकृष्ट बांधकाम करणाऱ्या संबंधित अधिकारी व ठेकेदाराची चाैकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सरपंच ललिता सुरेश सोनवणे, उपसरपंच लताबाई वाकळे, सदस्य नवनाथ ठिल्लारे, मनोज सोनवणे, शेख शबाना, योगिता ठिल्लारे, राजेंद्र कसारे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या छतावर चढून शोलेस्टाईल आंदोलन सुरू केले आहे.
कोट
सोनखेडा आरोग्य उपकेेंद्राच्या या निकृष्ट बांधकामाबाबत आरोग्य विभागास १५ व १८ जानेवारी २०१९ ला पत्राद्वारे कळविले होते. तसेच जि. प. सर्वसाधारण सभेत वारंवार या कामाबाबत प्रश्न उपस्थित केलेला आहे. तरीही आरोग्य विभागाने कोणतीही कारवाई केली नसल्याने आंदोलन करावे लागत आहे.
- प्रा. सुरेश सोनवणे, जि. प. सदस्य
फोटो कॅप्शन : सोनखेडा येथील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या निकृष्ट झालेल्या बांधकामाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी सरपंच ललिता सोनवणेसह सदस्यांनी शोलेस्टाईल आंदोलन सुरू केले आहे.
220221\sunil gangadhar ghodke_img-20210222-wa0063_1.jpg
खुलताबाद तालुक्यातील सोनखेडा येथील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या निकृष्ठ झालेल्या बांधकामाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी सरपंच ललिता सोनवणेसह सदस्यांनी शोलेस्टाईल आंदोलन सुरू केले आहे.